अंबेजोगाई-परळी रस्त्याची धुळीत हरवली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:33 IST2021-03-20T04:33:01+5:302021-03-20T04:33:01+5:30
अंबेजोगाई-परळी रस्ता वगळता अन्य रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. बऱ्याच रस्त्यांचे चित्र बदलल्याने हे रस्ते चांगले व मजबूत दिसू ...

अंबेजोगाई-परळी रस्त्याची धुळीत हरवली वाट
अंबेजोगाई-परळी रस्ता वगळता अन्य रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. बऱ्याच रस्त्यांचे चित्र बदलल्याने हे रस्ते चांगले व मजबूत दिसू लागले आहेत. अंबेजोगाई-लातूर कारखाना हा रस्ता चांगला झाल्याने वाहन चालकांना सोयीचा ठरला आहे व ते समाधान मानत आहेत. मात्र, अंबेजोगाई-परळी रस्त्याला अद्यापही चांगले दिवस मिळाले नाही. रस्ता दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने आहे. अर्धा रस्ता कच्चा व अर्धा रस्ता पक्का अशी या रस्त्याची अवस्था आहे. अशा खराब रस्त्यांवरून वाहने चालविणे अत्यंत धोक्याचे आहे. आशा ही अवस्थेत एसटी व अन्य वाहन चालकांना मोठी कसरत करत वाहने न्यावी लागतात. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. वारंवार या रस्त्याविषयी नागरिकांनी निवेदन दिली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा रस्ता अद्यापही धूळखात पडला आहे. जिल्ह्यातील चांगल्या रस्त्यांप्रमाणे अंबेजोगाई-परळी रस्त्याचे स्वप्न साकार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत हा अंबेजोगाई-परळी रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
190321\20210319_160537_14.jpg
===Caption===
अंबाजोगाई - परळी रस्त्याचे काम संथ गतीने होत असून प्रवाशांना धुळीचा सामना करावा लगत आहे.