माजलगावात मीरा एखंडे मृत्यूप्रकरणी सर्वपक्षीय मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:50 IST2019-01-08T00:49:43+5:302019-01-08T00:50:22+5:30
प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे, नवजात बालकाचा झालेला मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय संघटनांनी विभागीय कार्यालयावर सकाळी मूक मोर्चा काढून आक्रोश रस्त्यावर व्यक्त केला.

माजलगावात मीरा एखंडे मृत्यूप्रकरणी सर्वपक्षीय मूक मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे, नवजात बालकाचा झालेला मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय संघटनांनी विभागीय कार्यालयावर सकाळी मूक मोर्चा काढून आक्रोश रस्त्यावर व्यक्त केला. यात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे व नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. प्रसूती दरम्यान महिलेजवळ जबाबदार डॉक्टर उपस्थित नसल्याने व नर्सच्या माध्यमातून याठिकाणी प्रसूती करण्यात आली. हा प्रकार डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचा कळस आहे. जबाबदार डॉक्टरांची उपस्थिती असती तर महिला व बालकाचा प्राण वाचला असता. अशा बेजबाबदार डॉक्टरांवर त्वरित निलंबनाची कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी सोमवारी येथील हनुमान चौकातून हा सर्वपक्षीय संघटनांचा मूक मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्याकडे सादर केले.