दारूने केला घात; सासरवाडीत राहणाऱ्या जावयाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 18:00 IST2019-04-27T18:00:19+5:302019-04-27T18:00:56+5:30

रात्री मुलाने गावात त्यांच्या शोध घेतला

Alcohol addiction killed; suicide by son-in-law in Beed | दारूने केला घात; सासरवाडीत राहणाऱ्या जावयाने घेतला गळफास

दारूने केला घात; सासरवाडीत राहणाऱ्या जावयाने घेतला गळफास

बीड : सासरवाडीत राहणाऱ्या जावयाने दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री बीड तालुक्यातील शिदोड येथे घडली. 

सुरेश बाळू भाग्यवंत (४०, रा.जदीदजवळा, ता.माजलगाव, ह.मु.शिदोड ता.बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.  भाग्यवंत हे गेल्या दोन वर्षापासून शिदोड येथे  सासरवाडीतच राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली असून शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते दारूच्या नशेतच घरी गेले होते. त्यानंतर तेथून थोडा वेळाने ते घराबाहेर पडले. त्यांचा शोध घेण्यासाठी मुलगा परिसरात जावून आला मात्र वडील दिसून आले नाहीत.

रात्री ११ वाजता  सुरेश भाग्यवंत यांनी शिदोड शिवारातीलच एका लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी हा प्रकार समोर आला.  ग्रामीण ठाण्याचे सहायक फौजदार पी.डी. मांडवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला. सुनील कान्हू पाखरे यांच्या खबरेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Alcohol addiction killed; suicide by son-in-law in Beed