आ.ह. साळुंखे यांचा बुधवारी नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:03 IST2019-07-23T01:02:44+5:302019-07-23T01:03:13+5:30

डॉ. आ. ह. साळुंके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे बुधवारी सायं. ६ वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.

 Ah Salunkhe's civil service on Wednesday | आ.ह. साळुंखे यांचा बुधवारी नागरी सत्कार

आ.ह. साळुंखे यांचा बुधवारी नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ज्येष्ठ लेखक डॉ. आ. ह. साळुंके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे बुधवारी सायं. ६ वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे हे ज्येष्ठ परिवर्तनवादी विचारवंत तसेच लेखक आहेत. इतिहास संशोधन , धर्म चिकित्सा व व्यवस्थापन या संदर्भातील त्यांची साहित्य संपदा अनेक पिढ्यांना मार्गदर्शक करणारी ठरली आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात त्यांचे सत्कार होत आहेत. तसाच गौरव बीडकरांच्या वतीने होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे व्याख्यान देखील होणार आहे. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.आ.ह. साळुंखे गौरव समितीने केले आहे.

Web Title:  Ah Salunkhe's civil service on Wednesday