कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 18:43 IST2018-09-19T18:40:54+5:302018-09-19T18:43:07+5:30
पाटोदा तालुक्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
बीड : पाटोदा तालुक्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.
वामन पंढरीनाथ शेलार (रा.निरगुडी ता.पाटोदा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेलार यांच्याकडे बँकेसह खाजगी लोकांचे कर्ज होते. गतवर्षी पीक आले नाहीत. यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने पेरलेली पिके डोळ्यासमोर जळू लागली. अशा परिस्थिती कर्ज कसे फेडायचे, याची चिंता त्यांना होती. याबाबत त्यांनी नातेवाईकांना बोलून देखील दाखविले होते. यातूनच त्यांनी मंगळवारी त्यांनी शेतात असलेल्या विहिरीतील पाणी शेंदण्याच्या रहाटाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेलार यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.