विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:10 IST2019-09-22T00:10:32+5:302019-09-22T00:10:53+5:30
निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आण भयमुक्त वातावरणात पार पा़डण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आण भयमुक्त वातावरणात पार पा़डण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, जिल्हयात १ हजार ४९० ठिकाणी २ हजार ३२१ मतदार केंद्रे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार २८८ बॅलेट युनिट ३ हजार ६९ कन्ट्रोल युनिट आणि ३ हजार २१९ व्ही.व्ही. पॅट मशिन आहेत. २ हजार ५५३ मतदान केंद्र अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १७ हजार ९१८ इतके मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच ९८ टक्के मदतारांना ईपीक मतदार काडार्चे वाटप करण्यात आले आहे.
३१ आॅगस्ट या दिनांकापर्यंत बीड जिल्हयात एकूण २० लाख ५५ हजार १६८ मतदार, ४ हजार ४७१ सैनदल मतदार आणि ४ हजार ५८३ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी जि.प.सिईओ अजित कुंभार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, महेंद्रकुमार कांबळे, बीड उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.