शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:30 IST

अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांचे नागरिकासह तहसील कार्यालयासमोर आंदोलन लोकमत न्यूज गेवराई तालुक्यातील ...

अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांचे नागरिकासह तहसील कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत न्यूज गेवराई

तालुक्यातील गोदापात्र व सिंदफना नदी पट्‌ट्यात रात्री-अपरात्री हायवा व ट्रॅक्टरमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. यामुळे या भागातील या अवजड वाहनाने खराब होत आहे. याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याने, या विरोधात भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी गोदा पट्‌ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

गेवराई तालुक्यात गोदापत्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीबाबत आ.लक्षण पवार यांनी दि.१३ जानेवारी रोजी प्रशासनाला निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत प्रशासनाने कुठलीही दखल ना घेतल्याने, त्यांनी मंगळवारी उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, दि. ४ जानेवारी रोजी राक्षसभुवन रोडवरील गंगावाडी येथील रुस्तुम मते यांना वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगात हायवाने चिरडल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, या दुर्दैवी घटनेने गोदा पट्‌ट्यातील ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणात गाडी जप्त करून संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून, विशेष म्हणजे सदरील वाहनाचा मालक पोलीस कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. या आधीही वाळूने भरलेल्या वाहनांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत, तरी प्रशासन कोणतीही कठोर पावले उचलल्याचे निदर्शनात आले नाही. त्यामुळे गोदा पट्‌ट्यातील होणारा अवैध वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा, वाळू तस्करी करणाऱ्यावर कठोर निर्बंध घालावेत, वाळू लिलावाचे टेंडर तातडीने करून किचकट टेंडर प्रक्रिया सुलभ करून, त्याचे दर कमी करण्यात यावेत, असे केल्याने अवैध वाळू तस्करी व चोरीवर नियंत्रण ठेऊन वाहने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने धावणार नाहीत. इतक्या वर्षात गोदाकाठच्या वाळूचे लिलाव झालेले नाही, त्यामुळे सहा वर्षांत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. वाळू लिलावाचे अपसेट प्राइस जास्तीचे असल्यामुळे लिलाव टेंडर घेण्यास संबंधित गुत्तेदार धजावत नाहीत, त्यामुळे ही अपसेट प्राइस कमी करावी, जिल्हाधिकारी स्तरावर महसूल व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या स्पेशल टास्क फोर्स निर्माण करावा व त्यामध्ये माजी सैनिकांना सामावून घ्यावे, टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी व साठा करणाऱ्यावर धाडी टाकाव्यात, वाळू तस्करांना रात्री-अपरात्री मोबाइलद्वारे अपडेट माहिती देणाऱ्या महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे मोबाइल संभाषण तपासून दोषींवर कारवाई करावी, गंगावाडी प्रकरणात तलाठी निलंबित करण्यात आला आहे. मात्र, पोलीस अंमलदार यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तसेच गेवराई मतदार संघात असलेल्या गोदावरी सिंदफना नदी पट्‌ट्यातील वाळू वाहतूक व उत्कलनाबाबत असलेले नियम अपसेट प्राइससंदर्भात तातडीने मंत्रालयात सचिव स्तरावर बैठक घेण्यात यावी, यासह आदी मागण्या घेऊन आ.लक्ष्मण पवार यांनी गोदावरी व सिंदफना पट्ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी आ.लक्ष्मण पवार, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, सभापती दीपक सुरवसे, उपसभापती संदीप लगड, जि.प.सदस्य पांडुरंग थडगे, पंचायत समिती सदस्य प्रा.शाम कुंड, सरपंच ॲड.उद्धव रासकर, समाधान मस्के यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.

चौकट -

सायंकाळी उपोषणस्थळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी भेट देऊन आ.पवार यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली, तसेच वाळू बाबतीत निवेदनात दिलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी सचिवांशी बोलून वेळ मागवून घेत असल्याचे एसडीएम नामदेव टिळेकरांनी सांगितले असता, सचिवांनी शब्द डावलला, तर मंत्रालयासमोरच उपोषण करण्याचा इशारा आ.पवार यांनी यावेळी दिला.