शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

कार्यकर्ता सत्तेत जनसेवक, विरोधात योद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:55 PM

भाजपाचा कार्यकर्ता हा सत्तेत जनसेवक असतो तर विरोधात योद्धा असतो. अन्यायाविरोधात चीड हा त्यांच्या रक्तातील गुण आहे. आज सत्तेत नसलो तरी हताश होण्याची गरज नाही. मागणी करूनही मिळाले नाही तर आंदोलने करून मागण्या पूर्ण करण्याची धमक आपल्यामध्ये असल्याचे सांगत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : कार्यकर्त्यांशी साधला संवाद; म्हणाल्या...जिल्ह्यातील जनता क्रांतिकारी विचाराची

बीड : भाजपाचा कार्यकर्ता हा सत्तेत जनसेवक असतो तर विरोधात योद्धा असतो. अन्यायाविरोधात चीड हा त्यांच्या रक्तातील गुण आहे. आज सत्तेत नसलो तरी हताश होण्याची गरज नाही. मागणी करूनही मिळाले नाही तर आंदोलने करून मागण्या पूर्ण करण्याची धमक आपल्यामध्ये असल्याचे सांगत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले.शुक्रवारी बीडमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, राजेंद्र मस्के यांच्याकडे याआधी मोठे पद होते. आज ते राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. हे पद मोठी जबाबदारी आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. प्रत्येकाला मानसन्मानाने सोबत घेऊन काम करा. भविष्यात अनेक निवडणुकांना सामोरे जायचे असल्याचे त्या म्हणाल्या. सत्तेत असताना आपण अनेक लोकहिताची कामे केली आहेत. जनहितासाठी साहेबांचा संघर्षाचा वसा आपल्याकडे आहे. बीड जिल्ह्यातील जनता क्रांतिकारी विचारांची आहे. नेता बदलला तरी जनता बदलत नाही. त्यामुळे भविष्यात भाजपला चांगले दिवस येणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.यावेळी अक्षय मुंदडा, मोहन जगताप, माजी आ.आदिनाथराव नवले, केशवराव आंधळे, रमेश पोकळे, नवनाथ शिराळे, माजी जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, माजी उपाध्यक्षा जयश्री मस्के, जि. प. सदस्य भारतराव काळे, विजयकांत मुंडे, अशोक लोढा, राणा डोईफोडे, रामराव खेडकर, रामदास बडे, अविनाश मोरे, जगदीश गुरखुदे, धारूरचे नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर, राजेंद्र बांगर, सर्जेराव तांदळे, भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, आदित्य सारडा, बाबरी मुंडे, संगीता धसे, जयश्री मुंडे, चंपाबाई पानसंबळ, संध्या राजपूत, सरपंच वसंत गुंदेकर सह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडे