बीडच्या कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:52 IST2019-02-28T11:50:16+5:302019-02-28T11:52:17+5:30

कैद्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

accused's suicide attempt in Beed's Prison | बीडच्या कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बीडच्या कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड : येथील जिल्हा कारागृहात कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. प्रकाश विश्वनाथ झिंजुर्डे (नाळवंडी नाका) असे कैद्याचे नाव आहे. त्याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा कारागृहात आणले आहे. शिवाजीनगर ठाण्यात ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

विश्वनाथवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे तो जिल्हा कारागृहात बंदीस्त आहे. बुधवारी रात्री संरक्षक्ष भिंतीवरील काचा खाली पडल्या होत्या. याच काचाने त्याने हातावरच जखमा करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळची सुरक्षा रक्षकांनी पाहिल्याने त्याला तात्काळ थांबवित जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात बंदीस्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी लोकमतला दिली. बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात विश्वनाथ विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: accused's suicide attempt in Beed's Prison