पलायन केलेल्या आरोपीस १० दिवसानंतर बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:10 IST2019-06-14T00:10:15+5:302019-06-14T00:10:38+5:30

अत्याचार प्रकरणातील आरोपीने आष्टी पोलिसांना चकवा देत ठाण्यातून पलायन केल्याची घटना ३ जुन रोजी घडली होती. या आरोपीला गुरूवारी पहाटे लोणावळा येथून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

The accused who fled the house after 10 days | पलायन केलेल्या आरोपीस १० दिवसानंतर बेड्या

पलायन केलेल्या आरोपीस १० दिवसानंतर बेड्या

बीड : अत्याचार प्रकरणातील आरोपीने आष्टी पोलिसांना चकवा देत ठाण्यातून पलायन केल्याची घटना ३ जुन रोजी घडली होती. या आरोपीला गुरूवारी पहाटे लोणावळा येथून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपी फरार होता तोपर्यंत संरक्षणही दिले होते.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे एका १९ वर्षीय तरूणीला चाकुचा धाक दाखवून गावातीलच सुनिल डुकरे याने अत्याचार केला होता. त्यानंतर आष्टी पोलिसांनी सुनिलला चौकशीसाठी म्हणून ठाण्यात आणले. येथे त्याने आष्टी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते. त्याच्या शोधासाठी चार पथके नियूक्त केली होती.
अखेर गुरूवारी पहाटे त्याला लोणावळा येथून ताब्यात घेतल्याचे उपअधीक्षक विजय लगारे यांनी सांगितले. शुक्रवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेणार असल्याचेही लगारे म्हणाले.

Web Title: The accused who fled the house after 10 days