ऊसाच्या शेतात आरोपी लपून बसला; पोलिसांनी सापळा लावून अलगद पकडला

By सोमनाथ खताळ | Updated: July 15, 2023 15:10 IST2023-07-15T15:10:17+5:302023-07-15T15:10:27+5:30

बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई : अत्याचार करून अल्पवयीन मुलीचा केला गर्भपात 

Accused hid in a sugarcane field; Police laid a trap and caught him | ऊसाच्या शेतात आरोपी लपून बसला; पोलिसांनी सापळा लावून अलगद पकडला

ऊसाच्या शेतात आरोपी लपून बसला; पोलिसांनी सापळा लावून अलगद पकडला

बीड : तालुक्यातील एका गावातील १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. नंतर तिचा मित्रांच्या सहाय्याने छत्रपती संभाजीनगर शहराजवळ नेऊन गर्भपात केला. तेव्हापासून फरार झालेल्या आरोपीला बीड ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ऊसाच्या शेतात हा आरोपी लपून बसला होता. परंतू पोलिसांनी सर्व बाजूने सापळा लावून त्याला अलगद पकडले.

रणजीत शिवदा शेंडगे असे आरोपीचे नाव आहे. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला धमकी देत रणजीतने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर मित्रांच्या सहाय्याने तिला छत्रपती सभांजीनगर शहराजवळील एका डोंगरात नेले. रात्रभर तेथे ठेवून तिचा गर्भपात केला. तसेच जन्मलेल्या बाळाचीही विल्हेवाट लावली. त्यानंतर परत आल्यावर पीडितेच्या पालकांना धमकी देत गाव सोडण्यास भाग पाडले. परंतू याची पीडितेच्या चुलत भावाने तक्रार करताच या कुटूंबाला आधार देत गावी आणले. त्यानंतर ८ जूलै रोजी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

तेव्हापासून रणजीत हा पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. परंतू शुक्रवारी तो गावातीलच ऊसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सर्व बाजूने सापळा लावत त्याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सपोनि घनशाम अंतरप, उपनिरीक्षक राजाभाऊ गुळभिले, दतत्ता दुधाळ, सुनिल अलगट, अंकुश वरपे आदींनी केली.

Web Title: Accused hid in a sugarcane field; Police laid a trap and caught him