धार्मिक कार्यक्रमासाठी आईला सोडून घराकडे परणाऱ्या तरूणाचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 14:13 IST2024-01-05T14:13:02+5:302024-01-05T14:13:32+5:30
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया रोडवरील घटना

धार्मिक कार्यक्रमासाठी आईला सोडून घराकडे परणाऱ्या तरूणाचा अपघाती मृत्यू
- नितीन कांबळे
कडा- टाकळी अमिया येथील धार्मिक कार्यक्रमासाठी गुरूवारी रात्री आईला सोडून घराकडे दुचाकीवरून परणाऱ्या मुलाचा रात्री साडेनऊच्या दरम्यान अज्ञातवाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. वैभव उर्फ महेश नागेश होळकर ( १८) असे मृत तरूणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे काही दिवसांपासून संत बाळुदेव महाराजाच्या मेंढ्या आल्याने तिथे धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. गुरूवारी रात्री या कार्यक्रमासाठी महेश होळकर हा आईला घेऊन गेला होता. आईला तिथे सोडून महेश दुचाकीवरून ( m.h.१४ FU ५१०१) घराकडे निघाला. रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान टाकळी अमिया रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने महेशचा जागीच मृत्यू झाला.