शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

धारुर घाटात अपघात; एकजण जागीच ठार, एक गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 13:52 IST

राष्ट्रीय महामार्ग 548-सी या महामार्गावर अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

धारूर : तालुक्यात अपघाताची मालिका सुरुच असून शुक्रवारी ( दि.12 ) पहाटे आरणवाडी जवळील घाटात कार व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 548-सी या महामार्गावर अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

औरंगाबाद येथून लातूरकडे जात असताना एक कार ( एमएच 20 एफ पी 4132 ) तेलगावकडे जाणार्‍या मोटर सायकलला धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. मृताचे नाव शैलेश पवार (रा.औरंगाबाद) असल्याची माहिती आहे. जखमींना किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये  दाखल करण्यात आले आहे. यात एक वर्षाच्या रुद्र या बालकासह  प्रवीण कातळे, महारुद्र कातळे या दोघांचा समावेश होता. यातील प्रवीण यास गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलवण्यात आले आहे.

काल तेलगाव येथे बीड-परळी रस्त्यावर एका महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. तर अंबेवडगाव येथे दि.4 मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघात होवून एक तरुण ठार झाल्याची घटना घडली होती. राष्ट्रीय महामार्ग 548-सी वर वाढती वाहतूक व घाटातील अवघड वळणे अपघाताचे कारण ठरत आहेत. येथील घाट रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने घाटात तासनतास वाहतूक खोळंबत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातBeedबीड