सोशल मिडियातील ओळखीतून तरुणीवर अत्याचार, फरार आरोपीस ८ महिन्यांनी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 18:25 IST2023-10-17T18:25:16+5:302023-10-17T18:25:21+5:30
अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात आरोपी आठ महिन्यांपासून होता फरार

सोशल मिडियातील ओळखीतून तरुणीवर अत्याचार, फरार आरोपीस ८ महिन्यांनी अटक
- नितीन कांबळे
कडा- इंन्टाग्रामवर ओळखीतून अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आठ महिन्यांपासून फरार आरोपीच्या सोमवारी रात्री आष्टी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आसिफ राजू शेख ( रा.वरवंड ता.दौंड जि.पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे राहत असलेल्या एका २४ वर्षीय तरूणीची दौंड तालुक्यातील वरवंड येथील २६ वर्षीय तरूण आसिफ राजू शेख सोबत इंन्टाग्राम ओळख झाली.ओळखीचे रूपातंर प्रेमात झाले. दरम्यान, आर्थिक अडचण सांगून आसिफने तरुणीकडून ५६,७०० रूपये उकळले. त्यानंतर आसिफने २२ सप्टेंबर २०२२ रोजी तरूणाला पुण्यात बोलवले. दोघेजण फिरले गप्पा गोष्टी झाल्यानंतर तरूणी जामखेडल परत आली. २२ डिसेंबर २०२२ ला आसिफ पुणे येथून जामखेडला आला.त्यानंतर तरुणीस तो कड्यातील एका हाॅटेलवर घेऊन आला. येथे त्याने तरुणीवर अत्याचार केला. तसेच यावेळी त्याने तरुणीचे अश्लील फोटो केले.
दरम्यान, जानेवारी २०२३ रोजी तरुणीने पैसे परत मागितले असता आसिफने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.मार्च महिन्यात त्याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून फरार असलेल्या आसिफ राजू शेख याच्या वरवंड येथे पोलिसांनी सोमवारी मुसक्या आवळल्या. ही कामगिरी आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस,पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मजहर सय्यद, विकास जाधव,पोलीस हवालदार उदावंत यांनी केली.