फोटो काढायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टुडिओत अत्याचार; बीडमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:25 IST2022-02-17T16:25:40+5:302022-02-17T16:25:49+5:30
धारुर : फोटो काढण्यासाठी स्टुडिओत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शहरात १५ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी दोघांवर बलात्कार ...

फोटो काढायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टुडिओत अत्याचार; बीडमधील धक्कादायक घटना
धारुर : फोटो काढण्यासाठी स्टुडिओत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शहरात १५ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी दोघांवर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहेत.
मधुर फरतडे व सहदेव चाळक, अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील एक अल्पवयीन मुलगी सप्टेंबर २०२१ मध्ये पासपोर्ट फोटो काढण्यासाठी स्टुडिओत गेली होती. यावेळी त्याने फोटो काढला व प्रिंटसाठी दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी मुलगी आली असता, तिला दुकानात बसवून घेतले.
यावेळी त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर वारंवार पाच ते सहा जणांनी बळजबरीने अत्याचार केला. तुझ्या भावाला ठार मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे पीडितेने धारुर ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक विजय आटोळे यांनी सांगितले.