शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

भाजपा पदाधिकाऱ्यावर दबा धरून बसलेल्या तरुणाचे कोयत्याचे वार, हत्येने बीड जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:31 IST

कोयत्याने वार करून खून केल्यानंतर आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड) : शहरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका युवकाच्या खुनाच्या घटनेने माजलगाव शहरासह बीड जिल्हा हादरला आहे. बाबासाहेब प्रभाकर आगे ( रा. किट्टी आडगाव) असे मृताचे नाव आहे. ते भाजपाचे माजलगाव तालुका सरचिटणीस होते. दरम्यान, आरोपी नारायण शंकर फपाळ याने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याची आल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहिती नुसार, आज दुपारी माजलगाव शहरातील शाहू नगर भागात भाजपा कार्यालय आहे. येथे आज दुपारी तालुका सरचिटणीस बाबासाहेब आगे कामानिमित्त आले होते. काम आटोपून बाहेर पडताच तेथे दबा धरून बसलेल्या नारायण शंकर फपाळ याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. बचावासाठी आगे पुढे पळाले तेव्हा फपाळ याने पाठलाग केला. जिवाच्या आकांताने पुढे पळणाऱ्या आगे यांना स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर फपाळ याने गाठले. त्यानंतर फपाळ याने आगे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. 

प्रत्यक्षदर्शीनुसार फपाळ याने अगोदर आगे यांच्या पोटात वार करून दोन वार डोक्यात केले. त्यानंतर फपाळ तेथून पसार झाला. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली. पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी बाबासाहेब आगे यांना गंभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी आगे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हल्ल्याचे कारण अस्पष्टदरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी नारायण शंकर फपाळ पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्याने आगे यांचा  खून का केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, भर दिवसा रस्त्यावर हत्येच्या थरारक घटनेने माजलगाव शहरासह बीड जिल्हा हादरला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या