गावाकडे परतणाऱ्या दुचाकीस्वार तरुणास भरधाव ट्रकने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 16:51 IST2022-08-20T16:51:06+5:302022-08-20T16:51:21+5:30
शहागडजवळ रात्री ११ वाजता झाला अपघात

गावाकडे परतणाऱ्या दुचाकीस्वार तरुणास भरधाव ट्रकने चिरडले
गेवराई (बीड): गेवराईहून घनसांगवी तालुक्यातील मुळगावी परतणाऱ्या दुचाकीवरील तरुणाचा ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहागडजवळ घडली. गोपाल बालासाहेब इंगळे ( ३०, रा. आरगडे गव्हाण ता.घनसांगवी ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
गोपाल इंगळे शुक्रवारी कामानिमित्त गेवराईत आला होता. काम आटोपल्यानंतर गोपाल रात्री उशिरा दुचाकीवरून ( क्र. एम.एच २१ ए.वाय ५७२७ ) आरगडे गव्हाण गावाकडे निघाला. शहागडजवळ आला असता दुचाकीला पाठीमागून भरधाव ट्रकने (क्र. जी.जे ०४ ए.डब्यु ४१७४) धडक दिली. यात गोपलचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.