उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकली; दोन तरुणांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 23:38 IST2023-02-11T22:47:53+5:302023-02-11T23:38:07+5:30
अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर झाला अपघात

उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकली; दोन तरुणांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
अंबाजोगाई: परळी - अंबाजोगाई रस्त्यावर घाटावर काही अंतरावर भिषण आपघात घडला असून परळीतील तीन युवक गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एकावर उपचार करण्यात येत आहेत.
अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर आज सायंकाळी 6.45 वा.सुमारास मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांचा भिषण आपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळीतील तीन युवक मोटरसायकलवरुन परळीकडे येत असताना उसाच्या ट्रॉलीवर धडकुन आपघात घडला. परळी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचुन आपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवण्यात मदतकार्य केले. या आपघात जखमी झालेल्यांमध्ये व्यंकटेश कांदे राहणार बँक कॉलनी, रोहित भराडीया राहणार पद्मावती गल्ली, शुभम धोकटे राहणार इंडस्ट्रियल एरिया परळी यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली.
दरम्यान अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एकावर उपचार करण्यात येत आहेत.