आष्टी - जामखेड रोडवर पादचारी व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:45 AM2023-03-21T11:45:14+5:302023-03-21T11:45:50+5:30

आष्टी तालुक्यातील पोखरी फाटा जवळील घटना,मृताची ओळख अद्याप पटली नाही

A pedestrian was crushed by an unknown vehicle on Ashti-Jamkhed road | आष्टी - जामखेड रोडवर पादचारी व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडले

आष्टी - जामखेड रोडवर पादचारी व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडले

googlenewsNext

- अविनाश कदम
आष्टी ( बीड):
तालुक्यातील आष्टी - जामखेड रोडवर सोमवारी ( दि. २०) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पोखरी फाटा शिवारात पादचारी व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटली नाही. 

पोखरी शिवाराजवळील आष्टी-जामखेड रोडवरून एक व्यक्ती रात्री ११. ३० वाजेच्या सुमारास चालत जात होता. यावेळी अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात पायाला व डोक्याला गंभीर इजा होऊन पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, मृताची ओळख अदयाप पटलेली नाही. मृताच्या अंगात पांढरा टिपके असलेला काळा शर्ट, काळी पँट, बांधा सडपातळ, उंची ५ फूट २ इंच, रंग काळा सावळा आहे. याबाबत अधिक माहिती असल्यास पो.ह. विकास राठोड ( ८८८८८८२२३९ ) व पो.अ.गुजर ( ८८८८८८२२३९) यांच्याशी सानाप्र्क करण्याचे आवाहन आष्टी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: A pedestrian was crushed by an unknown vehicle on Ashti-Jamkhed road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.