धक्कादायक! दोन लेकरांसह आईने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:05 IST2024-05-03T17:02:38+5:302024-05-03T17:05:52+5:30
आष्टी तालुक्यातील महिंदा येथील घटना

धक्कादायक! दोन लेकरांसह आईने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
- नितीन कांबळे
कडा (जि. बीड) : दोन लेकरांसह २६ वर्षीय आईने घरापासून जवळच असलेल्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली. भाग्यश्री दिलीप दहिफळे, यश दिलीप दहिफळे, दीदी दिलीप दहिफळे अशी मयतांची नावे आहेत.
आष्टी तालुक्यातील बावी येथील भाग्यश्री हिचा काही वर्षांपूर्वी महिंदा येथील दिलीप दहिफळे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. बुधवारी भाग्यश्री हिने यश दिलीप दहिफळे (वय अडीच वर्ष), दीदी दिलीप दहिफळे (वय २ महिने) यांना सोबत घरापासून जवळच असलेल्या स्वत:च्या शेतातील विहिरीत बुधवारी दुपारच्या दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केली. दिलीप घरी आल्यानंतर घरात कोणीच दिसून न आल्याने शोध घेतला असता जवळच्या विहिरीत तीनही मृतदेह आढळून आले.
या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या का व कोणत्या कारणाने केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, अंमळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलिस उपनिरीक्षक पटेल, पोलिस हवालदार सालेम चाऊस, पोलिस नाईक योगेश बहिरवाल यांनी भेट दिली.
याबाबत आष्टीचे उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांना विचारले असता ते म्हणाले की, महिलेने दोन मुलांसह आत्महत्या केली असून, त्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलिस तपास सुरू असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.