शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

बीड भाजपमध्ये एक गट नाराजांचा; गोपीनाथ मुंडेंचे साथी का दुरावले?

By सोमनाथ खताळ | Updated: May 6, 2024 12:06 IST

संवाद दुरावल्याची खंत; रमेश पोकळे, स्वप्नील गलधरसह अनेकांचा समावेश

बीड : कोणत्याही पक्षात अंतर्गत गटबाजी असते. अशीच भाजपमध्येही आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत सक्रिय असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या पंकजा मुंडे यांच्यापासून दुरावत चालले आहेत. जिल्हा नेतृत्त्वाकडून मान, सन्मान आणि संवाद साधला जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. भाजपमध्ये असूनही माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, बीड तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा हा नाराज गट लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसते. 

पंकजा मुंडे त्यांचा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद दुरावत गेला. २०१९ साली त्यांचा परळी मतदारसंघातून विधानसभेत पराभव झाला. त्यानंतर त्या फारशा सक्रिय नव्हत्या. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटतही नव्हत्या. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होत गेले. आज गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत असणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपमध्ये अजुनही पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्यासाठी समोर येताना दिसत नाहीत. याची जाणीव पंकजा मुंडे यांना आहे. कारण २४ एप्रिल राेजी अर्ज दाखल केल्यावर झालेल्या जाहीर सभेत पंकजा यांनी बोलूनही दाखवले होते. परंतु, अद्याप तरी नाराजांची मनधरणी न झाल्याने हे सर्व लोक भाजप आणि नेतृत्त्वापासून दूर असल्याचे दिसत आहे.

लाेक दुरावल्याचा विचार केला का? रमेश पोकळे हे ११ वर्षे भाजप जिल्हाध्यक्ष राहिले. ते सध्या किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. स्वप्नील गलधर हे सध्या भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत. हे दाेघेही भाजप पदाधिकारी असताना पंकजा यांच्या प्रचारात सक्रिय नाहीत. एवढे सारे लोक का दुरावले? याचा विचार नेतृत्त्वाने न केल्यानेच हे चित्र आहे.

आम्ही रूसलो आहोत, हे समजायला चार वर्षे का लागली?जिल्हा नेतृत्त्वाचा कसलाही संवाद नाही की फोन नाही. संघटनात्मक बैठकांना बोलावले जात नाही. मान, सन्मान नाही. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून सर्वांना समान वागणूक दिली जात होती. सर्वांना जीव लावला जात होता. आताची नाराजी ही पदासाठी किंवा गुत्तेदारीसाठी नाही. आमच्याकडे काही तरी स्वाभिमान आहे, म्हणून आहे. सध्या तरी आम्ही मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात सक्रिय आहोत. बाकी वेळ आल्यावर सर्व काही स्पष्ट करू.- रमेश पोकळे, प्रदेश उपाध्यक्ष, किसान सेल

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Pankaja Mundeपंकजा मुंडेbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४