आईला पैठण येथे सोडून परतणाऱ्या बाईकस्वार मुलाला भरधाव वाहनाने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 18:24 IST2022-07-16T18:24:23+5:302022-07-16T18:24:35+5:30
पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.

आईला पैठण येथे सोडून परतणाऱ्या बाईकस्वार मुलाला भरधाव वाहनाने चिरडले
गेवराई (बीड) : आईला पैठण येथे सोडून गावी परतणाऱ्या तरुणास भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उमापुर फाटा येथे घडली. ताराचंद माणिक माळी ( ३५, वडगांव ढोक) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तालुक्यातील वडगाव ढोक येथील ताराचंद माणीक माळी हा आपल्या दुचाकीवरून ( एम.एच १६ बी.जे ७५८२) पैठण येथे आईस सोडण्यासाठी गेला होता. आज सकाळी तो पैठण येथून गावी परतत होता. यावेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात ताराचंद गंभीर जखमी झाला. धडक देणारे वाहन अपघातानंतर तेथून निघून गेले.
दरम्यान, प्रवास्यांनी जखमी ताराचंद याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी डाॅक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मृताच्या पश्चात आई-भाऊ, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.