बीडमध्ये ९२ किलो गांजा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:41 IST2018-06-02T00:41:36+5:302018-06-02T00:41:36+5:30

बीडमध्ये ९२ किलो गांजा नष्ट
बीड : गेवराई तालुक्यातील गढी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला ९२ किलो गांजा गुरूवारी न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
२४ आॅगस्ट २०१३ रोजी सचिन भिमराव मुंडे (रा.देवगव्हाण ता.अंबड जि.जालना) व एक जण कारमधून (एमएच २० बीवाय ९७५७) गांजा घेऊन जात असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा लावला आणि गढी फाटा येथे कार अडविली. यामधून ९२ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा निकाल लागला असून न्यायालयाच्या आदेशाने तो गांंजा गुरूवारी नष्ट करण्यात आला.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे, पोनि सुरेश बुधवंत, सपोनि दिलीप तेजनकर, बालाजी दराडे, जगदीश करांडे, गणेश हांगे, परमेश्वर सानप, देशमुख आदींनी कारवाई केली.