अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार ६८ कोटी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:44 IST2018-11-24T00:43:33+5:302018-11-24T00:44:37+5:30
२०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासनाने अतिवृष्टीबाधित शेतक-यांसाठी ६८ कोटी रुपये मदत दिली आहे.

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार ६८ कोटी मदत
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासनाने अतिवृष्टीबाधित शेतकºयांसाठी ६८ कोटी रुपये मदत दिली आहे. पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दोन वर्षापूर्वी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. शेतकºयांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले होते. तसेच शासनाकडे मदतीसाठी मागणी केली होती. मात्र, तब्बल दोन वर्षाने शासनाला ही मदत देण्यासंदर्भांत जाग आल्याचे दिसून येत आहे. आर्थिक मदत तात्काळ मिळावी, यासाठी शेतकºयांनी वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन देखील केले होते.
शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाच्या वतीने बुधवारी ६८ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश असून, जवळपास ८५ हजार ८७५ शेतकºयांना ही मदत मिळणार आहे. मात्र, दोन वर्षानंतर मदत देण्यात मिळणार असल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही देण्यात येणारी मदत नुकसान झाल्यानंतर लगेचच दिली असती तर, पुढील पेरणीसाठी कर्ज काढण्याची गरजच लागली नसती, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ही आलेली मदत तात्काळ बँक खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी शेतकºयांनी केली.
दोन वर्षांनंतर मिळाली मदत
२०१६ या वर्षात झालेल्या अतिवृष्टीबाधित शेतकºयांना तब्बल दोन वर्षानंतर मद देण्यात आली आहे.
मात्र, ही मदत योग्य वेळेवर दिली असती तर याचा फायदा शेतकºयांना झाला असता.
यावर्षी देखील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकºयांची स्थिती वाईट आहे. अनेक ठिकाणी पेरणी झाली नाही.
त्यामुळे शासनाच्या वतीने तातडीने शेतकºयांना मदत देणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रीय पोपट हावळे यांनी दिली.
८५ हजार ८७५ शेतकºयांना लाभ
२०१६ मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पंचनामे करण्यात आले होते. त्याद्वारे जिल्ह्यातील ८५ हजार ८७५ शेतकºयांना मदतीचा लाभ मिळणार आहे.