कोंबड्याच्या शेडमध्ये ठेवलेला ५९ किलो गांजा जप्त; आष्टी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:47 IST2022-12-12T17:46:49+5:302022-12-12T17:47:15+5:30
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

कोंबड्याच्या शेडमध्ये ठेवलेला ५९ किलो गांजा जप्त; आष्टी पोलिसांची कारवाई
- नितीन कांबळे
कडा - कोंबड्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला ५९ किलो गांजा आष्टी पोलिसांनी आज दुपारी भवरवाडी येथे कारवाईत जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
आष्टी तालुक्यातील भवरवाडी येथील हौसराव भवर याने कोंबड्याच्या शेडमध्ये गोण्यात चोरट्या विक्रीसाठी गांजा ठेवल्याची गुप्त माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी शेडवर धाड टाकत ६ लाख रुपयांचा तब्बल ५९ किलो गांजा जप्त केला.
याप्रकरणी आरोपी हौसराव भवरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलिस नाईक प्रवीण क्षीरसागर, अमोल ढवळे, सचिन पवळ, संतोष नाईकवाडे, बबरूवान वाणी यांनी केली.