बीड जिल्ह्यात ३५ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:03 IST2019-08-20T00:02:47+5:302019-08-20T00:03:15+5:30

शहरातील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

5-year-old married woman tortured in Beed district | बीड जिल्ह्यात ३५ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

बीड जिल्ह्यात ३५ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

वडवणी : शहरातील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीने स्वत:च्या फेसबुकवर पीडित महिलेचे अपमानीत करणारे फोटो अपलोड केले आहेत. या प्रकरणी शनिवारी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपी मात्र फरार आहे.
वडवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पावरलुम वस्ती येथील रहिवाशी गणेश बाबुराव पंधारे याने एका ३५ वर्षीय महिलेचा काही दिवसांपासून सतत पाठलाग करुन जवळीक साधली होती. तिची भेट घेऊन पीडित महिलेचे फोटो काढले व ते फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवीन, अशी धमकी दिली. पीडित महिलेवर बळजबरीने वारंवार अत्याचार केला.
तसेच गणेश पंधारे याने स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरुन पीडित महिला अपमानीत होईल असे मजकूर, पॅन कॉर्ड व फोटो अपलोड केले आहेत. म्हणून गणेश बाबुराव पंधारे याच्याविरुद्ध पीडित महिलेच्या फिर्यादिवरुन वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून, पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोउपनि परदेशी करत आहेत.

Web Title: 5-year-old married woman tortured in Beed district