4 hours sleep agitation of farmers in Cage | केजमध्ये शेतकऱ्यांचे २ तास झोपा आंदोलन
केजमध्ये शेतकऱ्यांचे २ तास झोपा आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार ‘आमचंबी ठरलंय’ म्हणत पंधरा-वीस गावातील शेतक-यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर दोन तास झोपून आंदोलन केले.
तालुक्यातील शेतक-यांच्या पशुधनाला दावणीला चारा-पाणी द्यावा, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पावसाअभावी वाळलेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, खरीप २०१७ तसेच २रबी २०१८ चा विमा शेतक-यांना द्यावा, २०१९ चा खरीप विमा जाहीर करून तोही तात्काळ वाटप करावा, टंचाई परिस्थितीवर तत्काळ उपाय करावेत, शेतकरी सन्मान योजनेची पूर्ण रक्कम शेतक-यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावी, पीक कर्जासाठी शेतक-यांची पिळवणूक थांबवावी या प्रमुख मागण्यांसाठी पंधरा-वीस गावातील शेतकरीआंदोलनात सहभागी झाले होते. यापूर्वी याच आंदोलकांनी दोन सप्टेंबर रोजी कुंबेफळ येथे रास्ता रोको आंदोलन केले होते.
शेतकरी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यासाठी गेले असता उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी निवेदन स्वीकारत या प्रश्नी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


Web Title: 4 hours sleep agitation of farmers in Cage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.