पत्नीच्या मृत्यूप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:17 AM2019-08-31T00:17:25+5:302019-08-31T00:19:22+5:30

१९ जुलै २०१८ रोजी मयत सारिका संतोष जाधव हिला तिचा नवरा संतोष बलभीम जाधव (रा. धानोरा, ता. आष्टी) याने रात्री ९.३० च्या दरम्यान दारू पिऊन मारहाण केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून सारिकाने आत्महत्या केली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्या. डी.एन. खडसे यांनी आरोपी संतोष जाधव याला दोषी ठरवून २९ आॅगस्ट २०१९ रोजी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

3 years of forced labor for the death of his wife | पत्नीच्या मृत्यूप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

Next
ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : नेहमीच दारू पिऊन पत्नीला देत होता त्रास

बीड : १९ जुलै २०१८ रोजी मयत सारिका संतोष जाधव हिला तिचा नवरा संतोष बलभीम जाधव (रा. धानोरा, ता. आष्टी) याने रात्री ९.३० च्या दरम्यान दारू पिऊन मारहाण केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून सारिकाने आत्महत्या केली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्या. डी.एन. खडसे यांनी आरोपी संतोष जाधव याला दोषी ठरवून २९ आॅगस्ट २०१९ रोजी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
आरोपी संतोष जाधव हा मयत सारिकाला नेहमीच दारू पिऊन शारीरिक व मानसिक त्रास देत असे. सततची होणारी मारहाण व त्रास सहन न झाल्यामुळे सारिकाने १९ जुलै २०१८ रोजी रात्री ९.३० दरम्यान अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वत: पेटवून घेतले. तिची आरडाओरड ऐकून इतर नातेवाईकांना आग विझविण्याचा प्रयत्न केला व अहमदनगर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले.
या प्रकरणी सारिकाने २० जुलै रोजी रात्री २.० वाजता आरोपीच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याच्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृत्युपूर्व जबाब दिला. त्यानंतर २७ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सारिकाचा भाऊ आजिनाथ नवनाथ गायकवाड (रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) याने याबाबतची फिर्याद दिली. त्यावरून आरोपी संतोष बलभीम जाधव याच्या विरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. डी. सिरसाट यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ते प्रकरण बीड येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्या. डी.एन. खडसे यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी, पंच, मृत्युपूर्व जबाबप्रसंगीचे साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष ग्राह्य धरून, तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांचे अवलोकन करून, अतिरिक्त जिल्हा व सरकारी वकील भागवत एस. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. डी.एन. खडसे यांनी आरोपी संतोष यास भादंवि कलम ३०६ अन्वये दोषी ठरविले. त्याला १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये आणि दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे भागवत एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना सर्व सहायक सरकारी वकील यांनी सहकार्य केले. या प्रकरणी कोर्ट पैरवी पो.हे.कॉ. व्ही. व्ही. नागरगोजे, पो.ह. व्ही.डी. बिनवडे यांनी मदत केली.

Web Title: 3 years of forced labor for the death of his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.