पंचायत समितींकडे २४० टँकरचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:31 IST2018-10-20T00:30:34+5:302018-10-20T00:31:35+5:30
यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आल आहे. ग्रामीण भागात देखील दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. पाण्यासाठी नागिराकना पायपीट करावी लागतेय. गावाच्या जवळपास पाणी नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडे २४० टँकरचे प्रस्ताव आले आहेत.

पंचायत समितींकडे २४० टँकरचे प्रस्ताव
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आल आहे. ग्रामीण भागात देखील दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. पाण्यासाठी नागिराकना पायपीट करावी लागतेय. गावाच्या जवळपास पाणी नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडे २४० टँकरचे प्रस्ताव आले आहेत.
बीड जिल्ह्यात १ हजार ३१ ग्रामपंचायती आहे. तर गावे, वाड्या, वस्त्या, तांडे यांची संख्या मिळून १५०० गावे आहेत. त्यापैकी अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आतापर्यत पंचायत समितींकडे २४० च्या जवळपास टँकरचे प्रस्ताव आले असून, हे प्रस्तावर प्रशासकीय मंजुरीसाठी तहसीलकडे पाठवण्यात आले आहेत,
जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये जवळपास दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. काही ठिकाणी बोअर, विहिरीला पाणी आहे, मात्र हे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत आहे.
ज्या गावांमध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांनी टँकरची मागणी पंचायत समितीकडे पाठवली आहे. हे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करुन ्पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्तांनी केली आहे. तसेच जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेमार्फत गावामधील हातपंप, पाणी असलेले शासकीय बोअर दुरुस्ती करावी, जेणेकरुन या बंद असलेल्या स्त्रोताचा वापर सर्वांना करता येईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोहयो अंतर्गत कामे सुरू करण्याची मागणी देखील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
तालुका टँकर प्रस्ताव
बीड १६
अंबाजोगाई ८४
परळी ५०
गेवराई २७
आष्टी २९
माजलगाव ४
शिरुर २६
पाटोदा २
धारुर २
केज ०
वडवणी ०
एकूण २४०