महावितरणाची तालुक्यात २२ कोटी रुपयांची थकबाकी ; २५ गावाचा विद्युत पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:01+5:302021-03-21T04:32:01+5:30
शहरातील व ग्रामीण भागात महावितरण विभागाचे सर्व मिळून जवळपास १९ हजार ६०० ग्राहक असून त्यापोटी शहरातील व तालुक्यातील घरगुती, ...

महावितरणाची तालुक्यात २२ कोटी रुपयांची थकबाकी ; २५ गावाचा विद्युत पुरवठा खंडित
शहरातील व ग्रामीण भागात महावितरण विभागाचे सर्व मिळून जवळपास १९ हजार ६०० ग्राहक असून त्यापोटी शहरातील व तालुक्यातील घरगुती, वाणिज्य, इंटस्ट्रीयल असा ग्राहकांकडे २२ कोटी रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महावितरण विभागाच्या वतीने अनेक वेळा आवाहन केले होते. मात्र भरणा झाला नाही. त्यामुळे सध्या तालुक्यात महावितरण विभागाच्या वतीने जोरदार वसुली मोहीम चालू आहे. जास्त थकबाकी असलेल्या तालुक्यातील २५ गावाचा विद्युत पुरवठा खंडित केला असल्याची माहिती महावितरण विभागाचे अभियंता बी.एन सिवलकर यांनी सांगितले.
तालुक्यातील जास्त थकबाकी असलेल्या २५ गावाचा विद्युत पुरवठा खंडित केला असलेल्या गावात टाकळगाव, एरंडगाव, सेलू तांडा, चिंचोली, आमला, गोळेगाव, जातेगाव, डोईफोडवाडी, बेलगुडवाडी, भेंड बु ,गैबीनगर तांडा, रामेश्वर गाव, आम्ला वाहेगाव, डिग्रस, हिंगणगावसह असे मिळून २५ गावाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महावितरण विभागाची तालुक्यातील अनेक ग्राहकांकडे २२ कोटी थकबाकी आहे. ग्राहकांनी ती भरावी, असे आवाहन महावितरण विभागाचे अभियंता बी.एन सिवलकर यांनी केले.
===Photopath===
200321\20210320_121512_14.jpg
===Caption===
महावितरण विभाग कार्यालय, गेवराई