'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 19:15 IST2022-02-28T19:14:56+5:302022-02-28T19:15:49+5:30

ल नांदुर घाट जिल्हा परिषद गटा मध्ये मागील पाच वर्षात विकास कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शासनाने मंजूर केला आहे

'100 crore corruption in our ZP group, ED should pay attention'; MNS banners flashed in villages | 'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर

'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर

केज (बीड ): तालुक्यातील नांदुर घाट जिल्हा परिषद गटामध्ये शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकास निधीच्या रकमेत भ्रष्टाचार करण्यात आल्याने याकडे ईडीने लक्ष घालावे, अशी मागणी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गावागावात लावलेल्या बॅनरची एकच चर्चा सध्या सुरु आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी विकास निधीच्या कामात भ्रष्टाचार झाला असून याच्या चौकशीची मागणी केली आहे.

 राज्यात ईडी मोठमोठ्या भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करत आहे. असेच गावागावातील लहान नेतेही मोठ्या भ्रष्टाचारात अडकले आहेत. केज तालुक्यातील नांदुर घाट जिल्हा परिषद गटा मध्ये मागील पाच वर्षात विकास कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शासनाने मंजूर केला. मात्र, यातून झालेल्या कामांत अनियमता व भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केला आहे. गटातील १०० कोटींच्या भ्रष्टाचाराकडे ईडीने लक्ष घ्यावे आणि चौकशी करावी, अशी मागणी करणारे बॅनर मनसेने गावागावात लावले आहेत. 
या भ्रष्टाचाराची माहिती किरीट सोमय्या यांना देखील देणार असल्याचे बॅनरवर नमूद केले आहे. गावागावात लावण्यात आलेल्या बॅनरची दखल ईडी घेईल का नाही हे सध्या अनुत्तरित आहे. मात्र, या बॅनरबाजीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

असे आहेत आरोप 
नांदुर मध्ये सहाशे मीटर सिमेंट रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी रुपये खर्च करूनही कामात दर्जा नाही सदर काम अपूर्ण आहे.
या ठिकाणच्या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्याचा असा कोणता व्यवसाय आहे ज्यातून दोन कोटी रुपयांचे घर व कोट्यवधीची माया जमविण्यात आली आहे ? 

Web Title: '100 crore corruption in our ZP group, ED should pay attention'; MNS banners flashed in villages