माजलगाव तालुक्यात उसाच्या क्षेञात 10 हजार हेक्टरची वाढ; कापूस व सोयाबीनचे क्षेत्र घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 19:47 IST2018-07-25T19:46:31+5:302018-07-25T19:47:58+5:30
तालुक्यात यंदा मान्सून पूर्व पाऊस चांगला झाल्याने कापूस क्षेञात वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर या पिकाकडे पाठ फिरवली आहे. उलट तालुक्यात उसाच्या क्षेञात 10 हजार हेक्टरची वाढ झाली.

माजलगाव तालुक्यात उसाच्या क्षेञात 10 हजार हेक्टरची वाढ; कापूस व सोयाबीनचे क्षेत्र घटले
माजलगाव ( बीड ) : तालुक्यात यंदा मान्सून पूर्व पाऊस चांगला झाल्याने कापूस क्षेञात वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर या पिकाकडे पाठ फिरवली आहे. उलट तालुक्यात उसाच्या क्षेञात 10 हजार हेक्टरची वाढ झाली.
तालुक्याचे यावर्षी खरीपाचे क्षेत्र 87 हजार 257 एवढे असून यापैकी 17 हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे.उरलेल्या क्षेञा पैकी 60 टक्के क्षेञावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी यावरच पिकाची लागवड केली. यात सोयाबीन, कापुस, तूर, मुग व बाजरी या पिकाकडे पाठ फिरवली. या पिकांच्या लागवडीत कमालीची घट दिसून आली. एकूण लागवडीत कापसाचे क्षेत्र 12 हजारने तर सोयाबीनचे क्षेत्र 4 हजारने घटले आहे. या उलट उसाचे क्षेत्र 10 हजार हेक्टरने वाढले. असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी पी.पी.कुंभार यांनी दिली.