बीड जिल्ह्यात १० हजार ४९ लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:43+5:302021-07-22T04:21:43+5:30

मंजूर झालेले घरकूल २०१६-१७ मध्ये ५८१० घरे मंजूर करण्यात आली होती. यापैकी ५ हजार ३९६ घरे पूर्ण झाली ...

10 thousand 49 beneficiaries got rightful houses in Beed district | बीड जिल्ह्यात १० हजार ४९ लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे घर

बीड जिल्ह्यात १० हजार ४९ लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे घर

googlenewsNext

मंजूर झालेले घरकूल

२०१६-१७ मध्ये ५८१० घरे मंजूर करण्यात आली होती. यापैकी ५ हजार ३९६ घरे पूर्ण झाली आहेत.

२०१७-१८ मध्ये १४७१ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी १ हजार २८५ घरे पूर्ण झाली आहेत.

२०१८-१९ मध्ये ६७६ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ५६७ घरे पूर्ण झाली आहेत.

२०१९-२० मध्ये ३५३७ घरे मंजूर झाली होती. त्यापैकी दोन हजार २२४ घरे पूर्ण झाली आहेत.

२०२०-२१ मध्ये ६७३० घरांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १ हजार ४७७ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.

२०२१-२२ साठी जिल्ह्यात १२,११५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

किती जणांना मिळाले राज्य शासनाचे तिन्ही टप्प्यांचे अनुदान? - १०,९४९

प्रत्येक लाभार्थ्याला किती अनुदान मिळते? - १,५०,०००

निधी पुरेसा उपलब्ध

कोरोना लॉकडाऊनमुळे योजनेत निधी मंजुरीला विलंब झाला होता. आता मात्र निधी पुरेसा उपलब्ध आहे. निधीचे वाटपही झाले आहे. एकही हप्ता थांबलेला नाही. जिओ टॅगिंगनुसार घरकूल बांधकामाच्या टप्प्यांनुसार शासनाचा निधी थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होतो. निधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

मोफत वाळूची मागणी नाही

घरकुलाचे बांधकाम करणारे लाभार्थी वाळूची मागणी संबंधित विभागाकडे करीत नाहीत. मध्यंतरी टेंडर झाले नसल्यामुळे वाळूचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे काही लाभार्थ्यांनी घराचे काम ‌थांबविले होते. तर काहींनी महागडी वाळू खरेदी करून घरकुलाचे टप्पे पूर्ण केले. आता वाळू घाटाचे अनेक ठिकाणी लिलाव झाले आहेत. त्यामुळे वाळूचे भाव कमी झाल्याने अडचणी येत नसल्याचे सांगण्यात येते.

---------

वर्ष २०२१-२२ साठी जिल्ह्यात १२ हजार ११५ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. संबंधित ग्रामपंचायतीने तत्काळ आधार सीडिंग व जॉब मॅपिंग करून घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उद्दिष्टानुसार घरकुले मंजूर केली जातात. संबंधित विभाग व यंत्रणेने घरकुलांच्या कामाला गती द्यावी.

- दादासाहेब वानखेडे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा.

--------------

अनुदान मिळाल्याने झाले

घरकुलाचे दीड लाख रुपये मिळाले, शिवाय स्वत:चे ७० हजार रुपये खर्चून घर बांधले आहे. घर बांधकामाला सहा-सात महिने लागले. सरकारचे अनुदान मिळाल्याने हे शक्य झाले.

- गणेश शिंदे, कोळवाडी, ता. बीड.

---------

घरकूल बांधकामाचे सर्व तीन हप्ते मिळाले. वाळू, बांधकाम साहित्य वेळेवर मिळाल्याने घराचे कामही पूर्ण झाले. आता हक्काच्या घरात राहात आहे.

- शहादेव जाधव, कोळवाडी, ता. बीड.

----

Web Title: 10 thousand 49 beneficiaries got rightful houses in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.