माजलगाव धरणातून १ लाख क्युसेकने सोडले पाणी; सिंधफणा नदीवरील जुना पूल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 18:35 IST2021-09-07T18:26:02+5:302021-09-07T18:35:00+5:30
Rain In Beed : शहरातील साठेनगर भागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

माजलगाव धरणातून १ लाख क्युसेकने सोडले पाणी; सिंधफणा नदीवरील जुना पूल पाण्याखाली
माजलगाव : तालुक्यात व माजलगाव धरण क्षेत्राच्यावरील भागात रात्रीपासून संततधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे धरणातून १ लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सिंधफना नदीत करण्यात येत आहे.
मागील तीन दिवसांपासून माजलगाव धरण क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे या धरणात आवक वाढली आहे. यामुळे सोमवारी पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर सिंधफणा नदी पात्रात धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. विसर्ग आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यातच मागील चोवीस तासापासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख क्युसेकपर्यंत वाढली. यामुळे प्रशासनाने मंगळवारी दुपारी चार वाजता धरणातून एक लाख क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी.आर. शेख यांनी दिली. दरम्यान, माजलगाव शहरातील जुन्या गावात असलेल्या साठेनगर भागात पाण्याचा धोका असल्याने या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सांडस चिंचोली या गावाचा पुराचा वेढा पडल्याने येथील नागरिकांना घराबाहेर पडू नये यासाठी याठिकाणी दौंडी देण्यात आली असल्याची माहिती येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे
हेही वाचा :
- video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजी वाढली; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले
- Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव
- जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद