शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

अधिक फायद्यासाठी कोणता फेसमास्क किती वेळ लावून ठेवावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 12:11 PM

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहीना काही करत असतात. फेस मास्क पार्लरमध्ये जाऊन लावा किंवा घरी लावा दोन्हींमध्ये फार फरक नाही.

(Image Credit : sheknows.com)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहीना काही करत असतात. फेस मास्क पार्लरमध्ये जाऊन लावा किंवा घरी लावा दोन्हींमध्ये फार फरक नाही. पण जाणून घेण्यासारखी बाब ही आहे की, आठवड्यातून किती वेळा किंवा महिन्यातून कितीवेळा फेस मास्कचा वापर करावा. कितीवेळा वापर केल्याने किती फायदा होतो किंवा नुकसान होतं हेही माहीत असणं गरजेचं आहे. फेस मास्कमुळे आपल्या त्वचेवर चमकदारपणा येतो आणि चेहरा स्वच्छ होतो.

वेगवेगळ्या स्कीन एक्सपर्टनुसार, तुम्ही कोणत्या प्रकारचा फेस मास्क वापरत आहात यावर त्याचा कितीदा वापर करावा हे निर्भर आहे. उदाहरण द्यायचंच तर ती खासप्रकारचे फेस मास्क असतात.

१) अ‍ॅंटी-एजिंग२) एक्स्फोलिएटिंग३) अ‍ॅंटी-एक्ने

याप्रकारचे फेस मास्क जास्तकरुन केमिकल असलेले असतात. त्यामुळे यांचा वापर निर्देशांनुसार केला जावा. सामान्यत: फेस मास्क महिन्यातून केवळ एक किंवा दोनदा वापरावे.

(Image Credit : tasteofhome.com)

रोज जे फेस मास्क वापरले जातात त्यांच्यात खालील क्वॉलिटी असतात.

- एलोवेरा

- अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट

- नियासिन व्हिटॅमिन

- व्हिटॅमिन्स

चला जाणून घेऊ कोणत्या प्रकारचं फेस पॅक किती अंतराने वापरावं.

१) चारकोल फेस मास्क

(Image Credit : nationalreview.com)

चारकोल फेस मास्क फार हार्श असतो आणि यात केमिकलचं प्रमाणही अधिक असतं. हे स्कीनमधून बॅक्टेरिया, टॉक्सिन, घाण, तेल, दुषित कण बाहेर काढतात. हा मास्क एकदाच फार खोलवर प्रभाव करतो त्यामुळे याचा वापर महिन्यातून केवळ एकदाच व्हायला हवा. 

२) जेलाटीन फेस मास्क

(Image Credit : thebeautyholic.co)

त्वचेमध्ये पोषक तत्व कमी असल्याने त्वचा कोमजल्यावर, डेड स्कीन सेल्स वाढल्यावर जेलाटीन फेस मास्कचा वापर केला जातो. पण हा मास्क स्कीनला इजा पोहोचवू शकतो. त्यामुळे याचा वापर जास्त किंवा लवकर करु नये. स्कीन एक्सपर्ट महिन्यातून दोनदा जेलाटीन फेस मास्क वापरण्याचा सल्ला देतात. 

३) कोरियन शीट फेस मास्क

(Image Credit : wellandgood.com)

अलिकडे मार्केटमध्ये शीट रुपातील फेस मास्क भरपूर आले आहेत. यांचा वापर करण्याचा फॅशन ट्रेन्ड होत आहे. हा मास्क चेहऱ्यावर लावल्यावर २० मिनिटांनी हा मास्क आपोआप भिजून निघू लागतो. या २० मिनिटांमध्येच हा मास्क आपलं काम करुन जातो. हा मास्क आठवड्यातून एकदा लावण्याचा सल्ला किंवा महिन्यातून तीनदा लावण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात.

४) क्ले फेस मास्क

(Image Credit : bustle.com)

क्ले फेस मास्कला लोक नैसर्गिक मानतात आणि याचा वापर अधिक करतात. पण या फेस मास्कमध्येही केमिकलचं प्रमाण असतं. क्ले मास्क स्कीनवर आतपर्यंत प्रभाव करतो आणि त्वचेला पोषक तत्व देतो. क्ले फेस मास्क आठवड्यातून दोनदा वापरला जाऊ शकतो.

५) घरी तयार केलेले फेस मास्क

नैसर्गिक वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फेस मास्क त्वचेसाठी वापरल्यास नेहमी पॉझिटीव्ह रिझल्ट मिळतो. या केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं. जर त्यात तुम्ही काही मिश्रित केलं तरच त्यात केमिकल येतं. नैसर्गिक असल्याने याचा वापर नुकसानकारक नाहीये. तरीही याचा आठवड्यातून तीनदा वापर केला जाऊ शकतो.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स