Natural Remedies For Baldness: कमी वयातच टक्कल पडलेले लोक नेहमीच याच विचारात असतात की, त्यांचे केस पुन्हा कसे वाढतील. यासाठी ते सतत काहीना काही उपाय शोधत असतात. काहींना यांपासून फायदा मिळतो तर काहींच्या हाती केवळ निराशा येते. तुमचे केस गेले असतील आणि केस पुन्हा कसे येतील? असा प्रश्न पडला असेल तर काही रामबाण उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मात्र, हेही लक्षात ठेवा की, हे उपाय करून काही एकाएकी तुमचे केस वाढणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला नियमितपणे यांचं वापर करावा लागेल.
केस वाढण्याचे घरगुती उपाय
१) कांद्याचा रस
कांद्याच्या रसामध्ये सल्फर आढळतं. जे केसांची वाढ करण्यास मदत करतं. कांद्याचा रस काढून जेथील केस गेलेत तिथे लावा. हे २० ते ३० मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर माइल्ड शाम्पूनं केस धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करून बघा. काही महिने हा उपाय केल्यास फरक दिसून येईल.
२) कोरफड
कोरफडचा गर केसाच्या मुळांना पोषण देतो आणि केस मजबूत करतो. ताज्या कोरफडीचा गर काढा आणि डोक्याच्या त्वचेवर लावा. १ तासांनं केस पाण्यानं धुवून घ्या. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा.
३) आवळा आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स असतात, जे केसगळती रोखतात आणि केसांची वाढ होण्यास मदत करतात. आवळा पावडर खोबऱ्याच्या तेलात टाकून गरम करा. हे तेल थंड झाल्यावर डोक्याची मालिश करा. रात्रीभर तेल केसांना तसंच राहू द्या आणि सकाळी धुवून घ्या. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करू शकता.
४) मेथीच्या बियांची पेस्ट
मेथीमध्ये निकोटिनिक अॅसिड आणि प्रोटीन असतं, जे केसांची वाढ होण्यास मदत करतं. मेथीच्या बीया रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी या बियांची पेस्ट तयार करा आणि डोक्यावर लावा. ३० मिनिटं तशीच ठेवा. हा उपाय आठवड्यातून १ ते २ वेळा करू शकता.
५) ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असतात, जे केसांची वाढ होण्यास फायदेशीर ठरतात. ग्रीन टी उकडून थंड करा. नंतर केसांवर लावा. १ तासांनी केस धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.