आता घरच्या घरीच सोप्या पद्धतीने करा स्पा सारखचं फेशिअल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:24 IST2019-01-14T16:23:29+5:302019-01-14T16:24:34+5:30
महिला आपल्या सौंदर्याप्रति फार जागरूक असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. सुंदर दिसण्यासाठी महिला फक्त पार्लर ट्रिटमेंटचाच आधार घेत नाहीत तर बाजारात मिळणाऱ्या महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचाही आधार घेत असतात.

आता घरच्या घरीच सोप्या पद्धतीने करा स्पा सारखचं फेशिअल!
महिला आपल्या सौंदर्याप्रति फार जागरूक असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. सुंदर दिसण्यासाठी महिला फक्त पार्लर ट्रिटमेंटचाच आधार घेत नाहीत तर बाजारात मिळणाऱ्या महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचाही आधार घेत असतात. पण अनेकदा एवढे उपाय करूनही काही फायदा होत नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की, तुमचा चेहऱ्यावरील उजाळा कमी होत आहे आणि आता पार्लरमध्ये जाण्याची गरज आहे तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरच्या घरीही स्किन स्पा घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करण्याची आवश्यकता आहे. जाणून घेऊया त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही स्टेप्स...
1. सर्वात आधी आपले हात स्वच्छ धुवून घ्या. कारण चेहऱ्याचा मसाज तुम्ही हातांनेच करणार आहात त्यामुळे हात स्वच्छ असणं आवश्यक आहे. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यासाठी तुम्ही मधाचा फेस क्लिंजर म्हणून वापर करू शकता.
2. मध चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा स्वच्छ करून घ्या. केस व्यवस्थित बांधून घ्या. अन्यथा स्पा करताना सतत चेहऱ्यावर येणार नाहीत याची काळजी घ्या.
3. मधाने चेहरा स्वच्छ केल्यानंतर दूध किंवा इतर माइल्ड क्लिंजरने चेहरा स्वच्छ करा. मेकअप काढून टाकण्यासाठी कापसाचा वापर करा.
4. आता चेहऱ्यावर स्क्रब करा. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल. स्पा करण्याआधी चेहऱ्याला स्क्रब आणि एक्स्फोलीऐट करणं अत्यंत आवश्यक असतं.
5. आता एका स्वच्छ कपड्याने आपला चेहरा स्वच्छ करा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. आता चेहऱ्याला वाफ द्या. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं चेहऱ्याला वाफ घ्या.
6. वाफ घेतल्यानंतर फेशिअस मास्क अप्लाय करा. यासाठी आपण आपल्या स्किन टाइपनुसार मास्क निवडा. ऑयली स्किनसाठी तुम्ही मड मास्क किंवा क्ले मास्क वापरू शकता. तसेच ड्राय स्किनसाठी क्रिमी किंवा हायड्रेटिंग फेस मास्क वापरू शकता.