कॅन्सरग्रस्त गर्भवतीवरही उपचार शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:45 IST2016-01-16T01:19:17+5:302016-02-09T11:45:58+5:30
कॅन्सर या आजाराचे नाव ऐकताच शरीरातले उरले-सुरले बळही निघून जाते आणि हा आजार गर्भवती महिलेला जडला अस...
.jpg)
कॅन्सरग्रस्त गर्भवतीवरही उपचार शक्य
क न्सर या आजाराचे नाव ऐकताच शरीरातले उरले-सुरले बळही निघून जाते आणि हा आजार गर्भवती महिलेला जडला असेल तर चिंतेचे प्रमाण आणखी वाढते. कारण यावरील उपचाराचा पोटातील बाळावर वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता असते.
परंतु आता ही चिंता कमी करणारी बातमी आली आहे. एका नव्या संशोधनानुसार जी गर्भवती महिला कॅन्सरपीडित आहे तिने प्रेग्नंसीमध्ये केमोथेरपी किंवा इतर कॅन्सर ट्रिटमेंट घेतली तरी बाळावर त्याचा कुठलाही अनिष्ट परिणाम होत नाही, अशी एक उपचार पद्धती शोधून काढण्यात आली आहे.
त्यामुळे गर्भवती महिलांनी प्रेग्नंसीदरम्यान कॅन्सर ट्रिटमेंट घेण्यास दिरंगाई अथवा वेळेआधी डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. प्रेग्नंसीच्या दुसर्या किंवा तिसर्या ट्रायमिस्टरमध्ये कॅन्सर ट्रिटमेंट घेतल्यानंरतही निरोगी बाळाचा जन्म होतो, असे या नव्या संशोधनात म्हटले आहे,
बेल्जियमच्या कॅथोलिक विद्यापीठातील प्राध्यापक व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. फ्रेडरिक अमांत सांगतात, 'आमच्या संशोधानामुळे हे स्पष्ट झाले की कॅन्सरचा इलाज कारण्यासाठी गर्भधारणेचा अडथळा नसतो.
गर्भवती नसलेल्या महिलेचा जसा कॅन्सर इलाज होतो अगदी तसाच इलाज कॅन्सरपीडित गर्भवती महिलेचा करता येतो. केमोथेरपी, रेडिओथेरपीचा कसलाच दूष्परिणाम अर्भकावर होत नाही.
तसे पाहिले तर ही खरचं आश्चर्याची बाब आहे कारण कॅन्सर ट्रिटमेंट ही फार विषारी असते.' यासंबंधी अधिक जनजागृती होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.