लांब आणि दाट केस सगळ्यांनाच हवे असतात. महिला या दाट केस मिळवण्यासाठी महागड्या पार्लरमध्ये स्पा करण्यापासून वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात.  व्यस्त  जीवनशैली आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे केसांचे आरोग्य चांगलं राहत नाही. एकदा केस गळायला  सूरूवात झाली की त्यानंतर पुन्हा चांगली वाढ होण्यासाठी अनेक  दिवस लागतात.  पुष्कळ महिला केसांची निगा राखण्याच्या बाबतीत खूप चुका करत असतात. त्यामुळे त्यांच्या नकळतपणे केस जास्त गळायला सुरूवात होते.  चला तर मग जाणून घेऊया केसांसंबंधी कोणत्या चुका महागात पडू शकतात. 

Image result for hairfall(image credit-ehealth magazine)

केसांना दोन भागात विभागात विभागणी करा 

Image result for HAIR DIVIDE

केस दाट होण्यासाठी तेल लावताना सुद्धा केसांची दोन भागात विभागणी करा. अशा पध्दतीने तेल लावल्यास केसांच्या मुळानां तेल लागेल. तसंच बाहेर जाताना सुद्धा केस तुम्हाला मोकळे ठेवायचे असतील तर त्यांची दोन भागात विभागणी करा.  त्यामुळे तुमचे केस दाट दिसून येतील. 

रोलर्सचा वापर करा.

रोलर्स का उपयोग करें

केसांना दाट बनवण्यासाठी  सगळ्यात  महत्वाचा पर्याय म्हणजे केसांवर रोलर्सचा वापर करा. त्यासाठी केसांना रोलर्स २० मिनिटं राहू द्या.त्यानंतर तुम्ही  रोलर्स काढून टाका असं केल्यास केसात फरक दिसून येईल. 

आहार व्यवस्थित घ्या 

Image result for balance diet

आपलं डाएट  केसांची वाढ होण्यासाठी मदत करत असतं. पण खाण्यामध्ये फास्ट फूड आणि आरोग्याला अपायकारक असं खाणं जास्त प्रमाणात खात राहिल्यास, केसगळती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोषक आहाराची मात्रा वाढवा. त्यासाठी अंडी खा. कारण अंड्याचा पिवळा भाग सोडता बाकीच्या भागात प्रोटिन्सचे प्रमाण अधिक असते. 

आवळ्याचा वापर-

Image result for aamla for hairs

आवळा हे केसांसाठी नैसर्गिक औषध आहे. यातील गुणधर्म तुमच्या केसांना अधिक सुंदर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे याचा नियमित वापर केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्यास मदत होते.  त्यामुले आवळ्याचा रस करून केसांना लावा आणि ते सुकल्यानंतर केस धूवून टाका.

नारळाचं तेल 

Image result for coconut oil

जर तुम्हाला दाट आणि लांब केस हवे असतील तर नारळाचं तेल हा सर्वात चांगला नैसर्गिक घरगुती उपाय आहे. नारळाचं तेल तुमचे केस मुळापासून चांगलं राखण्यासस मदत करतं. केस तुटण्यापासून नारळाचं तेल वाचवतं. नारळाचं तेल म्हणजे केसांसाठी प्रिकंडिशनिंग आहे. आठवड्यातुन किमान दोन- ते तीनवेळा केसांची नारळाच्या तेलाने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका.( हे पण वाचा-घरच्या घरी केस स्ट्रेट करण्याच्या सोप्या टिप्स, पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज!) 

झोपताना केस बांधणे

Image result for HAIRS OPEN WHILE SLEEPING(Image credit-luxy hair extension)

नेहमी रात्रीच्या वेळी केसं बांधून किंवा वेणी घालून झोपणं फायदेशीर ठरतं असतं. जर तुम्हाला रात्री केस मोकळे ठेवण्याची सवय असेल तर तुम्हाला महागात सुद्धा पडू शकतं.  कारण त्यामुळे केस गुंता होतात. केस तुटण्याची शक्यता असते. त्यासाठी झोपताना वेळ काढून केसांची वेणी घालून मगच झोपा. ( हे पण वाचा-केस गळती रोखण्यासाठी अनेक प्रयोग करून थकलात? तर आता मेथीच्या वापराने मिळवा नवे केस)

Web Title: Tips to get long and thick hair by using home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.