रोज होणाऱ्या केसगळतीने महिला असो वा पुरूष चिंतेत असतात. कारण केसांवर प्रत्येकाचा लूक अवलंबून असतो. सगळेच लोक केसगळती रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरत असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, केस केवळ त्यांची विशेष काळजी न घेतल्यानेच गळत नाही तर काही आजारही याला कारणीभूत असतात.

केसगळती होत असलेल्या काही लोकांना वाटतं की, केसगळती ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे. यावर तज्ज्ञांचं असं मत आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे रोज ७० ते १०० केस गळत असतील तर ही स्थिती घाबरण्याची नाहीये. पण जर केस यापेक्षा अधिक गळत असतील तर आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत असेल तर तुम्हाला हेअरकेअर प्रॉडक्टची नाही तर आणखीही कशाची गरज आहे. कारण ही केसगळती काही आजाराचे संकेतही देते.

थायरॉइड

हायपोथायरायडिजम आणि हायपरथायरायडिजम जास्त काळ केसगळतीचं कारण ठरू शकतं. थायरॉइड डिसऑर्डरवर योग्य आणि वेळीच उपचार केले तर याने केसगळती तर थांबेलच सोबतच नविन केस येण्यासही मदत मिळेल. पण या प्रोसेसला काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

कॅन्सर

(Image Credit : medicalnewstoday.com)

कॅन्सरच्या रूग्णांची केसगळती होणे ही एक सामान्य समस्या आहे. कधी कधी वेगाने गळणारे केस याचाही संकेत आहेत की, शरीरात कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याचा धोका वाढत आहे. जसे की, हॉजकिन लिंफोमासारखे काही कॅन्सर केसगळतीचं कारण ठरू शकतात. पण मुळात मुख्यत्वे कीमोथेरपीमुळे वेगाने केसगळती होते.

ईटिंग डिसऑर्डर

(Image Credit : webmd.com)

स्लीम फिट शरीराच्या हव्यासामुळे तरूण लोक एनॉरेक्सिया आणि बुलिमियासारख्या ईटिंग डिसऑर्डरचे शिकार होतात. या तरूणांमध्ये जास्तीत जास्त संख्या मुलींची आणि महिलांची असते. शरीरातील इतर समस्यांसोबतच ईटिंग डिसऑर्डर हे सुद्धा केसगळतीचं एक मुख्य कारण बनत आहे. कारण आपल्या शरीराला गरजेचं न्यूट्रिएंट्स पोहोचू शकत नाही आणि पोषण मिळत नसल्याने केसगळती होऊ लागते.

डिप्रेशन

डिप्रेशन किंवा चिंता केल्यानेही केसगळती वेगाने होऊ लागते. कोणतीही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याआधी जास्त काळासाठी चिंता आणि तणावाच्या स्थितीत राहते. या स्थितित शरीरात आवश्यक हार्मोन्सची निर्मिती होत नाही आणि पचनक्रियाही बिघडू शकते. यानेच केसांना आवश्यक ते पोषण मिळत नाही.

ब्लड प्रेशर

जर कुणी जास्त काळापासून हाय ब्लड प्रेशरचे शिकार असतील तर त्यांना केसगळतीची समस्या होऊ शकते. कारण या स्थितीत ब्लड आर्टरीजवर ब्लड फ्लोचं अधिक प्रेशर असतं. ब्लडमध्ये सोडिअमचं प्रमाण अधिक असतं. ही स्थिती हृदयासोबतच केसांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असते.

लूपुस 

लुपूस एक ऑटोइम्यून डिजीज आहे. यात शरीरात सूज येऊ लागते. ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा आणि केसांची मूळं मुख्य रूपाने प्रभावित होतात. यात डोक्यावरील केस वेगाने गळू लागतात. तसेच काही लोकांमध्ये त आयब्रो, मिशी आणि दाढीचे केस गळण्याची समस्या देखील होते.


Web Title: These diseases that may cause of hair fall and hair loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.