'मूछे नहीं तो कुछभी नहीं' हा हिंदी चित्रपटांमधील जुना डायलॉग आहे. त्या काळात मिशा म्हणजे, पुरूषांची शान समजलं जायचं. त्यामुळे आजही अनेकजण क्लिन शेव्हला महत्त्व देत असले तरिही मिशा असणाऱ्या पुरूषांचा लूक खुलून दिसतो. पण सध्या मिशा ठेवणं ही फॅशन बनली आहे.  याव्यतिरिक्त अनेक पुरूष महिलांना आकर्षित करण्यासाठी दाढी मिशी असणारा लूक सर्रास कॅरी करताना दिसून येतात. अनेक बॉलिवूड अभिनेते आपल्या मिशी असणाऱ्या लूकमुळेच अनेक तरूणींच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. जाणून घेऊया अशा काही बॉलिवूड अभिनेत्यांबाबत ज्यांच्या दाट आणि रूबाबदार मिशांमुळे अनेक तरूणींसोबत तरूणही त्यांचे फॅन झाले आहेत. 

रणवीर सिंह 

मिशांबाबत चर्चा असेल आणि त्यामध्ये रणवीर सिंगचं नाव नाही तर, आश्चर्यच... रणवीरने आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांमधून मिशांना अनेक फॅशन स्टेटमेंट्स केलं आहे. 

शाहीद कपूर
 
रणवीरप्रमाणेच शाहीद कपूरच्या मिशांच्याही अनेक तरूणी फॅन आहेत. शाहीदने पद्मावत आणि कबीर सिंग यांमध्ये कॅरी केलेला लूक अनेक फॅन्स फॉलो करताना दिसत आहेत. 

अक्षय कुमार 

राउडी राठोड पासून अक्षय कुमार आपल्या मिळांमुळे फार प्रसिद्ध झाला होता. यानंतरही अक्षयने अनेक चित्रपटांमध्ये मिशा असलेला लूक कॅरी केला होता. 

जॉन इब्राहिम

काही चित्रपटांमध्ये जॉन इब्राहिमनेही मिशा असणारा लूक कॅरी केला होता. जॉनच्या फिटनेसच्या अनेक तरूणी फॅन आहेत. पण त्याच्या मिशांनी अनेक तरूणींच्या काळचा ठोका चुकवला. 

सलमान खान 

रॉबिनहुड पान्डेच्या भूमिकेमध्ये सलमान खानच्या रूबाबदार मिशांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या लूकमध्ये सलमानच्या मिशा लांब नसल्या तरिही अनेक तरूणांसाठी ती स्टाइल स्टेटमेंट ठरली. 

बॉलिवूडच्या अभिनेत्यांप्रमाणे स्टायलिश, दाट मिशा असलेला लूक कॅरी करण्यासाठी तुम्ही घरीच तेल तयार करू शकता. जाणून घेऊया तेल तयार करण्याची पद्धत...  

- सर्वात आधी एक काचेची बाटली घ्या. जर तुम्ही पहिल्यांदा ऑइल तयार करत असाल तर लक्षात ठेवा की, हे ऑइल तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर न करता काचेच्याच बाटलीचा वापर करा. 

- जर तुम्हाला बाटली मिळत असेल तर, एक बेसिक तेल घाला. तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करू शकता. उदा. खोबऱ्याचं तेल, ऑलिव्ह ऑइल, आवळ्याचं तेल, कोरफडीचं तेल यांपैकी कोणतही तेल तुम्ही वापरू शकता. 

- ऑइल काचेच्या बाटलीमध्ये भरून घ्या. लक्षात ठेवा तेवढचं तेल बाटलीमध्ये ओता जेवढं तुम्ही वापरणार आहात. 

- त्यानंतर एका ड्रॉपरचा वापर करून ऑइलमध्ये तुमच्या आवडीच्या एसिन्शिअल ऑइलचे काही थेंब एकत्र करा. 

- एसिन्शिअल ऑइलचबाबात जास्त विचार करू नका. तुम्हाला ज्या ऑइलचा गंध आवडेले त्याचा वापर तुम्ही करू शकता. 

- दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर बाटली बंद करून व्यवस्थित शेक करून घ्या. त्यामुळे दोन्ही ऑइल एकत्र होण्यास मदत होते. आता तेल वापरण्यासाठी तयार आहे. 

- तयार ऑइलचा दिवसातून कमीत कमी एकदा वापर करा. तसेच रात्री झोपताना मिशांना हे ऑइल लावा आणि सकाळी उठल्यानंतर धुवून टाका. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: These 5 bollywood actors have got the most stylish and perfect moustache use homemade moustache oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.