पिंपल्स पळवण्याचे खास घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 16:38 IST2018-05-18T16:33:22+5:302018-05-18T16:38:01+5:30
जे लोक उन्हात बाहेर पडतात त्यांना पिंपल्सचा अधिक त्रास होतो. चला जाणून घेऊया पिंपल्सपासून सुटका मिळवण्याचे काही घरगुती उपाय..

पिंपल्स पळवण्याचे खास घरगुती उपाय
(Image Credit: Livestrong.com)
पिंपल्स होणे ही तशी सामान्य बाब आहे. पण पिंपल्समुळे नेहमीसाठी चेहऱ्यावर काळे डाग पडतात. यामुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते. जे लोक उन्हात बाहेर पडतात त्यांना पिंपल्सचा अधिक त्रास होतो. चला जाणून घेऊया पिंपल्सपासून सुटका मिळवण्याचे काही घरगुती उपाय..
पिंपल्स कमी करण्यासाठी सर्वातआधी तर तुम्हाला तेलकट खाणे टाळले पाहिजे. त्यासोबतच रात्री जास्त जागरण करु नका. वेळेवर झोपण्याची सवय लावा. अधिक प्रमाणात पाणी प्या. याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडलीत.
लिंबू दोन तुकड्यांमध्ये कापून चेहऱ्यावर चोळा, त्याने चेहऱ्यावरची सगळी घाण निघून जाईल. लिंबूमध्ये अॅसिडीक गुण असतात जे पिंपल्स दूर करण्यास मदत करतात.
पिंपल्स दूर करण्यासाठी सर्वात चांगला घरगुती उपाय मध सुद्धा मानला जातो. पिंपल्सवर मध 30 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. याने पिंपल्सपासून सुटका मिळेल.
चेहऱ्याच्या ज्या भागावर पिंपल्स झाले आहेत त्या भागावर बर्फाच्या तुकड्याने मसाज करा. पिंपल्स लगेच दूर होतील.
सफरचंद आरोग्यासाठी अनेक बाबतीने फायद्याचं आहे. सफरचंदाचं साल पिंपल्सवर लावल्यास आराम मिळतो.
पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी अडंही फार उपयोगी आहे. अंड्याचा पांढरा भाग मधात मिश्रित करुन चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. याने पिंपल्सपासून आराम मिळेल.