चांगल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी प्रभावी ठरतं 'ड्राय ब्रशिंग'; कमी खर्चात त्वचेला 'असा' होतो फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 11:46 AM2020-09-17T11:46:38+5:302020-09-17T11:54:32+5:30

याशिवाय त्वचेतील छिद्र उघडली जातात त्यामुळे घाम येणं अतिशय सोपं होतं. त्यामुळे त्वचा डिटॉक्स होण्यासाठी मदत मिळते. आज आम्ही तुम्हाला ड्राय ब्रशिंगचे फायदे सांगणार आहोत. 

Skin care tips Marathi : 'Dry brushing' is effective for protect from skin problems | चांगल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी प्रभावी ठरतं 'ड्राय ब्रशिंग'; कमी खर्चात त्वचेला 'असा' होतो फायदा

चांगल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी प्रभावी ठरतं 'ड्राय ब्रशिंग'; कमी खर्चात त्वचेला 'असा' होतो फायदा

Next

ड्राय ब्रशिंग त्वचेच्या समस्या दूर घालवण्यासाठी एक सोपा आयुर्वेदिक उपचार आहे.  हिवाळा, उन्हाळा कोणत्याही वातावरणात ड्राय ब्रशिंगच्या साहाय्यानं तुम्ही त्वचेच्या सौंदर्याची काळजी घेऊ शकता. ड्राय ब्रशिंग त्वचेच्या पेशींना उत्तेजित करण्याासाठी उत्तम ठरतं. याशिवाय त्वचेतील छिद्र उघडली जातात त्यामुळे घाम येणं अतिशय सोपं होतं. त्यामुळे त्वचा डिटॉक्स होण्यासाठी मदत मिळते. आज आम्ही तुम्हाला ड्राय ब्रशिंगचे फायदे सांगणार आहोत. 

ड्राय ब्रशिंगचे फायदे

जर तुम्ही तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करायचा विचार करत असाल तर ड्राय ब्रशिंगशिवाय  दुसरा चांगला उपाय नाही. रोज एका स्वच्छ आणि सुक्या ब्रशच्या साहाय्यानं  त्वचेवर ब्रशिंग केल्यास मृतपेशी हटवण्यासाठी तसंच त्वचा  तजेलदार होण्यासाठी मदत होते. यामुळे त्वचेतील विषारी घटक घामाद्वारे  बाहेर निघून जातात. ड्राय ब्रशिंगच्या साहाय्यानं पेशींना सक्रिय करता येतं. ब्लड सर्क्यूलेशन चांगले राहण्यास मदत होते. 

मालिश केल्यामुळे  त्वचेच्या नसांना आराम मिळतो. त्याचप्रमाणे ड्राय ब्रशिंगने त्वचा चांगली राहते. जर तुम्ही सतत स्पा किंवा  सलूनमध्ये जात नसाल तर अंघोळ करण्याच्या काही तास आधी  ड्राय ब्रशिंग करा. ड्रायब्रशिंगमुळे शरीरातील ताण तणावपूर्ण मासपेशींना आराम मिळतो. अनेकदा शरीरावरचे केस काढण्यासाठी वॅक्सिंग किंवा रेजरचा  वापर केला जातो. अशावेळी केस काढण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून ड्राय ब्रशिंग करणं महत्वाचं ठरतं.

तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यासाठी ही  सोपी प्रक्रिया आहे. जर तुम्ही ड्राय ब्रशिंगचा वापर केला तर प्रभावीपणे हे केस दूर करण्यास मदत होऊ शकते. यासाठी त्वचेला ब्रश करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे. ड्राय ब्रशिंग त्वचेच्या खालच्या लेअरसाठी ही चांगले ठरतं. त्वचेची ब्रशिंग केल्यानंतर सेल्यूलाईटशीसुद्धा सामना करता येऊ शकतो. सेल्यूलाईट कमी करण्यासाठी ड्राय ब्रशिंग उत्तम पर्याय आहे.

कसा कराल वापर?

 आंघोळ करण्याआधी ब्रशने हळूहळू पायांवर घासा.  हा ब्रशी तुम्ही सर्कुलर मोशनमध्ये फिरवत रहा. शरीराच्या इतर भागांवरही तुम्ही ब्रश फिरवू शकता.  संवेदनशील अंगांवर ब्रश फिरवताना काळजी घ्या.
नंतर गरम पाण्याने आंघोळ करा.

अशी घ्या काळजी

जर ब्रशने कोणत्याही प्रकारचे रॅशेज, जखम झाली असेल तर ब्रशिंग करुन नये. रॅशेज आणि संक्रमण झालं असेल तर ब्रशिंगने संक्रमण संपूर्ण शरीरावर पसरु शकतं. कधीही ब्रश पाण्यात भिजवू नका. नेहमी कोरड्या ब्रशचा वापर करा. ब्रश किमान आठवड्यातून एकदा पाणी किंवा साबणाने स्वच्छ करा. ब्रश धुतल्यानंतर तो हवेशीर ठेवा. चांगल्याप्रकारे कोरडा झाल्यावरच त्याचा वापर करा. ब्रशिंग करताना त्वचेवर जास्त दबाव टाकू नका. हळूहळू त्वचेवर ब्रशिंग करा. जर तुम्ही जास्त जोर लावला तर त्वचेवर खाज किंवा रेडनेस येण्याची शक्यता असते.

हे पण वाचा-

महागड्या ट्रिटमेंट्सपेक्षा बडीशोपेचं तेल वापराल; तर केस गळण्याची समस्या कायमची होईल दूर 

चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशन झटपट दूर करण्यासाठी 'चारोळीचा' असा करा वापर

हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

Web Title: Skin care tips Marathi : 'Dry brushing' is effective for protect from skin problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.