केस आणि त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे ग्रीन कॉफी बीन्स, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:12 IST2019-04-10T12:01:13+5:302019-04-10T12:12:26+5:30
ज्याप्रकारे ग्रीन टी लोकांमध्ये लोकप्रिय आहे, त्याचप्रमाणे ग्रीन कॉफी बीन्सचा चलनात आहेत. ग्रीन कॉफी बीन्स म्हणजेय कॉफीच्या बीया या भाजलेल्या नसतात.

केस आणि त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे ग्रीन कॉफी बीन्स, जाणून घ्या
ज्याप्रकारे ग्रीन टी लोकांमध्ये लोकप्रिय आहे, त्याचप्रमाणे ग्रीन कॉफी बीन्सचा चलनात आहेत. ग्रीन कॉफी बीन्स म्हणजेय कॉफीच्या बीया या भाजलेल्या नसतात. ज्या बीया भाजलेल्या असतात त्यातून नैसर्गिक अॅंटीऑक्सिडेंट निघून जातात. त्यानंतर त्यांचा आरोग्याला हवा तो फायदा होत नाही. ग्रीन कॉफीबाबत तज्ज्ञांचं मत आहे की, सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्ता करण्याआधी ग्रीन कॉफीचं नियमीत सेवन केल्यास तुम्ही सहजपणे वजन कमी करु शकता. सोबतच त्वचा आणि केसांनाही याचे अनेक फायदे होतात.
(Image Credit : The Fit Indian)
जर तुम्हाला कळालं की, याने तुमच्या त्वचेला काय काय फायदे होतात तर तुम्ही लगेच याचं सेवन सुरु कराल, ग्रीन कॉफी बीन्समध्ये सामान्य कॉफीच्या तुलनेत जास्त क्लोरोजेनिक अॅसिड असतं. असे म्हटले जाते की, हे अॅसिड हेल्थसाठी फार चांगलं असतं. वैज्ञानिकांच्या रिसर्चकडे पाहिलं तर हे दिसून येतं की, ग्रीन कॉफीमध्ये असे तत्त्व असतात जे शरीराला वेगवेगळे फायदे देतात.
ग्रीन कॉफी तयार करण्याची पद्धत
ग्रीन कॉफी तयार करण्याची पद्धत फारच सोपी आहे. ही कॉफी पिण्यासाठी रोस्टेड कॉफीऐवजी ग्रीन कॉफी बीन्सचा वापर करा. ग्रीन कॉफी बीन्स उकडण्याऐवजी गरम पाण्यात काही वेळासाठी भिजवा आणि त्यावर झाकण ठेवा. पाणी फार जास्त गरम असू नये. कारण तसं असेल तर यातील पोषक तत्त्व नष्ट होतील.
काय होतात फायदे?
1) केसगळती थांबते
आजकाल खराब लाइफस्टाइलमुळे महिला आणि पुरुषांना कमी वयातच केसगळीच्या समस्येचा सामना करावा लागतोय. ग्रीन कॉफी बीन्स फीमेल बाल्डनेस पॅटर्नला ठिक करण्यासाठी फार फायदेशीर मानले जातात. याने केवळ केसगळती थांबते असं नाही तर याने केस जाडही होतात.
२) केस वाढवा
ऑक्सिडेंट्स वाईट मानले जातात, कारण आवश्यक तत्त्व केसांच्या मुळाशी जाण्यापासून हे रोखतात. ग्रीन बीन्स अॅंटीऑक्सिडेंट्स काढतात, ज्याने केसांची वाढ होते आणि केस मजबूत व शायनी होतात.
३) अॅंटी-एजिंग
जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असतील तर तुमच्यासाठी ग्रीन कॉफी बीन्स फार चांगली ठरू शकते. याने शरीराच्या आतील त्वचेला पोषण मिळतं आणि त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसत नाहीत.
४) फ्रि रॅडिरल्सपासून बचाव
स्कीन डॅमेज होण्याचं मुख्य कारण असतं फ्रि रॅडिकल्स. ग्रीन कॉफी, ग्रीन टी च्या तुलनेत १० टक्के वेगाने फ्रि रॅडिकल्सशी लढण्यासाठी फायदेशीर असते.
(Image Credit : Nykaa)
५) नैसर्गिक मॉइश्चरायजर
ग्रीन कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असतात. जे त्वचेचे सेल्स मॉइश्चराइज करतात. त्यासोबतच याने त्वचा मुलायम होते.
६) चमकदार त्वचा
आपण जे काही खातो त्यानुसारचं आपल्या त्वचेचा विकास होतो. ग्रीन कॉफी शरीराला आतून डिटॉक्स करते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक उजाळा येतो.
(टिप : वरील उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)