शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

४ महिन्यात २१ किलो वजन केलं कमी, जाणून घ्या भूमी पेडनेकरचा वेट लॉस प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 11:27 IST

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडनेकरने जेव्हा सिनेमात काम केलं तेव्हा कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं की, इतकी वजनदार अभिनेत्रीही ग्लॅमरस दिसू शकते.

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडनेकरने जेव्हा सिनेमात काम केलं तेव्हा कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं की, इतकी वजनदार अभिनेत्रीही ग्लॅमरस दिसू शकते. पण भूमीने आपल्या वेटलॉसने सर्वांनाच चकीत करुन सोडले. पण तिच्यासाठी हे अजिबात सोपं नव्हतं हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. कारण वजन कमी करण्यासाठी किती आणि काय धडपड करावी लागते हे तुम्हीही करुन पाहिलं असेलच. पण भूमीने वजन करण्यासाठी अजिबात घाई केली नाही. त्यासाठी तिने प्लॅनिंगने काम केलं. चला जाणून घेऊ वजन कमी करण्याचा तिचा फंडा काय आहे. 

वजन कमी करण्यासाठी भूमी पेडनेकरने तिच्या एक्सरसाइजसोबतच डाएटवर फोकस केलं. यासाठी तिने तिच्या खाण्या-पिण्याच्या सवयीही बदलल्या. भूमीच्या आहारात काही पदार्थ नव्याने आले तर काही दूर केले गेले. जसे की, आहारात गव्हाच्या चपात्यांऐवजी मल्टीग्रेन चपात्या आल्या. भाताची जागा राजगिऱ्याने घेतली. तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांची जागा उकळलेल्या भाज्यांनी घेतली. सोबत ऑलिव्ह ऑईलचा आपल्या डाएटमध्ये समावेश केला.  

भूमीने आपलं वजन कमी करण्याची सुरुवात बॉडी डिटॉक्सने केली. यासाठी ती रोज सकाळी उठून कोरफडीचा ज्यूस पित होती. या ज्यूसमुळे वजन वाढल्याने तिच्या शरीरात वाढलेले टॉक्सिन दूर होण्यास मदत झाली. तसेच सोबतच ती रोज दोन कप ग्रीन टी सुद्धा पित होती. 

या गोष्टी केल्या बंद

भूमीने बाहेरचं खाण्यासोबत चीज, बटर आणि जंक फूट खाणे बंद केले. साखरेला आपल्या डाएटमधून दूर केले आणि त्याजागी डाएटमध्ये खजूराचं सिरप, मध आणि गुळाचा समावेश केला. 

काकडीचं पाणी पिणे सुरु केलं

वजन कमी करण्यासाठी भूमीने तिच्या लिक्विड डाएटवर फार जास्त फोकस केला होता. यासाठी तिने स्वत:चं एक डिटॉक्स ड्रिंकही सुरु केलं होतं. एक लिटर पाण्यामध्ये ती तीन काकड्या कापून टाकत होती. सोबतच यात काही पुदीन्याची पाने आणि ४ लिंबाचा रसही टाकत होती. हे पाणी फ्रिजमध्ये थंड करुन दिवसभर पित होती. 

भूमीचं डेली रुटीन

सकाळी वॉक, दुपारी जिम आणि सायंकाळी वॉलीबॉल, बॅटमिंटन किंवा स्विमिंगसोबत ती डान्स करत होती. 

खूप भूक लागल्यावर स्ट्रॉबेरी आली कामी

भूमीने एका मुलाखतीत सांगतिले होते की, जेव्हा तिला खूप जोरात भूक लागते तेव्हा ती मिक्सरमध्ये एक ग्लास पाणी, २ चमचे दही आणि त्यात काही स्ट्रॉबेरीज मिश्रित करुन ज्यूस तयार करते. याने लगेच एनर्जी मिळते. अनेकदा डार्क चॉकलेटही मिळते. कारण त्यात ७० टक्के कोकोआ, थोडी साखर आणि खूपसारे अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. 

असा होता रोजचा डाएट प्लॅन

ब्रेकफास्ट - वर्कआऊटनंतक भूमी मल्टीग्रेन ब्रेडसोबत ३ अंड्यांचा पांढरा भाग खात होती. त्यासोबतच ती दूध तिच्या ब्रेकफास्टचा मुख्य भाग होता. अनेकदा चणे, चिकन, फिश किंवा उकळलेल्या रंगीबेरंगी भाज्याही ती खात होती. 

लंच - भाजी, पोळी, चिकन-भात किंवा केवळ डाळ-भात हे तिच्या लंचमध्ये असायचं. यात एका वाटी भाजी, दोन चपात्या आणि एक ग्लास छाछ याचा समावेश होता. पण चपाती ती गव्हापासून तयार खात नव्हती. 

४ वाजता नंतर स्नॅक्स - अर्धी पपई, पेरु ही फळे खात होती. १ कप ग्रीन टीसोबत ती अक्रोड किंवा बदामही खात असे. सायंकाळी ७ वाजता ती एक वाटी सॅलड खात असे, ज्यात भाज्या आणि ड्रायफ्रूट्स असत.

डिनर - भूमि रात्रीचं जेवण ८ वाजता करते. या जेवणात सीफूड, पनीर आणि वाफवलेल्या भाज्यांचा समावेश होता. त्यासोबतच ती एक छोटी वाटी ब्राऊन राइसही खाते.  

टॅग्स :bhumi pednekarभूमी पेडणेकर Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स