मेहंदीमध्ये मिसळून घ्या 'हे' 4 पदार्थ; म्हातारपणातही काळेभोर राहतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 12:22 PM2019-10-20T12:22:31+5:302019-10-20T12:23:05+5:30

अनेकजण केसांना कलर करण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सऐवजी मेंहदी लावणं पसंत करतात. परंतु, अनेकदा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे त्याचा केसांना संपूर्ण फायदा होत नाही.

Mix these 4 things in mehndi hair will not become white | मेहंदीमध्ये मिसळून घ्या 'हे' 4 पदार्थ; म्हातारपणातही काळेभोर राहतील केस

मेहंदीमध्ये मिसळून घ्या 'हे' 4 पदार्थ; म्हातारपणातही काळेभोर राहतील केस

googlenewsNext

अनेकजण केसांना कलर करण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सऐवजी मेंहदी लावणं पसंत करतात. परंतु, अनेकदा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे त्याचा केसांना संपूर्ण फायदा होत नाही. अशातच आज आम्ही तुम्हाला काही अशा पद्धतींबाबत सांगणार आहोत. जर त्या पद्धती लक्षात घेऊन मेहंदी केसांना लावली तर अनेक फायदे होतात. तसेच म्हातरपणीही केस पांढरे होणार नाहीत. 

 

सर्वात आधी आपण जाणून घेऊया मेहंदी भिजवण्यासाठी पाणी तयार करण्याची पद्धत... 

साहित्य : 

  • पाणी एक ग्लास 
  • मेथीच्या दाण्यांची पावडर 
  • कॉफी पावडर एक चमचा
  • लवंगाची पावडर एक चमचा 

 

कसं कराल तयार? 

मेहंदी भिजवण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर आणि कॉफी पावडर एकत्र करून 2 ते 3 मिनिटांपर्यंत गॅसवर उकळत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये लवंगाची पावडर एकत्र करून 3 मिनिटांसाठी पुन्हा उकळून घ्या. तयार मिश्रण गॅस बंद करून बाजूला ठेवा. 

मेथीच्या दाण्यांची पावडर केसांना नॅचरली मजबूत आणि काळे करण्यासाठी मदत करते. तर कॉफी पावडर मेहंदीचा रंग डार्क करण्यासाठी मदत करतो. तसेच लवंगाची पावडर केसांना मुळापासून मजबुत करते. 

जाणून घेऊया केसांसाठी मेहंदी तयार करण्याची पद्धत... 

साहित्य :

  • मेहंदी 100 ग्रॅम
  • जास्वंदाची पावडर
  • आवळ्याची पावडर 
  • शिकेखाई पावडर 
  • कॉफी पावडर एक चमचा

 

कसं कराल तयार? 

मेहंदी तयार भिजवण्यासाठी एक लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा घ्या.  त्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करा. लक्षात ठेवा की, मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडाची कढई किंवा लोखंडाच्या भांड्याचा वापर करा. या भांड्यांमध्ये मेहंदी व्यवस्थित ऑक्सिडाइट होण्यास मदत होते. आता यामध्ये तयार पाणी एकत्र करा आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. 

असा करा वापर... 

- सर्वात आधी केसांना एखाद्या माइल्ड शॅम्पूने धुवून घ्या, त्यामुळे केसांवरील सगळी धूळ-माती, तेलकटपणा दूर होण्यास मदत होते. लक्षात ठेवा की, जर तुम्ही केस नाही धुतले तर मेहंदीचा रंग व्यवस्थित केसांना लागणार नाही. तसेच केसांना सीरम लावत असाल तर तेदेखील लावू नये. 

- आता मेहंदी केसांना अप्लाय करा आणि कमीत कमी 2 ते 3 तांसांसाठी तसचं ठेवा. 

- केसांना लावलेली मेहंदी व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या आणि लक्षात ठेवा की, मेहंदी लावल्यानंतर शॅम्पूचा वापर करू नका. त्यातबरोबर कोणत्याही प्रोडक्टचा वापर करणंही टाळा. कारण यामुळे कलर लाइट होऊ शकतो. 

- रात्री झोपण्यापूर्वी केसांना मोहरीचं तेल लावा. यामुळे मेहंदीचा रंग आणखी पक्का होण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)


Web Title: Mix these 4 things in mehndi hair will not become white

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.