फरशीवर पडलेले पदार्थ खाऊ नकाअसा एक गैरसमज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:55 IST2016-01-16T01:20:14+5:302016-02-07T13:55:35+5:30
असा एक गैरसमज आहे की, जमिनीवर पडलेले पदार्थ जर पाच सेंकदाच्या आतमध्...

फरशीवर पडलेले पदार्थ खाऊ नकाअसा एक गैरसमज...
फ शीवर पडलेले पदार्थ खाऊ नका
असा एक गैरसमज आहे की, जमिनीवर पडलेले पदार्थ जर पाच सेंकदाच्या आतमध्ये उचलले तर त्यांच्यावर जंतूचा प्रादुर्भाव होत नाही. परंतु हे खरे नाही. यासंबंधी सर्व प्रथम जिलिअन क्लार्क या विद्यार्थिनीने २00३ मध्ये प्रयोग केला. इलेनॉय विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये केलेल्या एका प्रयोगात तिने एका मुलायम आणि एका खरबडीत पृष्ठभागावर पोटदुखी, उलटी होण्याला कारणीभूत 'बॅक्टेरिआ ई कॉली' पसरविले. त्या पृष्ठभागांवर बिस्किट पाच सेंकद ठेवून तपासले असता असे दिसून आले की, मुलायम पृष्ठभागांवर जंतूंचा प्रादुर्भाव लवकर होतो. साऊथ करोलिना विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल डॉसन यांनी २00७ मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात लिहिले आहे की, कार्पेटवर केवळ १ टक्के जंतू तर फरशी किंवा लाकडी पृष्ठभागांवरील ७0 टक्के जंतू पदार्थावर चढतात. त्यामुळे पाच सेंकदाचा नियम हा काही शास्त्रीय नाही. लोकांचा तो केवळ गैरसमज आहे. जंतूचे छोटेशे प्रमाणही तुम्हाला आजारी करण्यसास पुरेसे आहे. पण तरी देखील खाली पडलेला तुमच्या आवडीचा खाद्यपदार्थ जर तुम्हाला खायचाच असेल तर तो कार्पेटवर पडलेला असेल तरच खा.