शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

छंदा शिवाय जीवन अधूरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 20:47 IST

मानवाला जीवनामध्ये छंद असणे हे खूप गरजेचे आहे.

 छंदामुळे कोणत्याही कामाचा तणाव घालविता येतो. त्यामुळे चित्रकला, वाचन, संगीत, नृत्य, नाट्य, लेखन आदी कुठलातरी  छंद हा प्रत्येकांनी जोपासलाच  पाहीजे. छंदाशिवाय  जीवन हे समृद्ध होऊच शकत नाही. मनाची सक्षमता तसेच  उत्साह  वाढविण्यासाठ छंद हा फार आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकाने आपल्या दररोजच्या कामातून वेळ काढून छंदाची जोपासना करावी. छंद हा व्यावहारीक, सामाजिक व भावनीक ओलावा कायम टिकवून ठेवण्याचे काम करतो. जीनाचाही अर्थ छंदाशिवाय कळून येत नाही. उद्योगपती, राजकारणी, बॉलीवूड स्टार सुद्धा छंदाची जोपासना हमखास करतात. तसेच छंदावर आधारित अनेक चित्रपटही आहेत. छंदाचे फायदे दैनंदिन तणावापासून सुटका. सकारात्मकता वाढते. आत्मविश्वास वाढून न्यूनंगड घालविता येतो. मनाला आत्मशांती मिळते व मनोरंजनही होते. स्वत: सह दुसºयालाही प्रेरणा मिळते. नवनवीन कल्पना सुचतात. मेंदू तल्लक राहून, एकाग्रता वाढते. आपल्या नोकरी व व्यवसायातही छंदाचा फायदा होतो. कितीही काम केले तर तणावापासून दूर राहता येते. त्यामुळे आॅफिस व कुटुंबातही नेहमी सकारात्मक वातावरण टिकवून ठेवता येते. तसेच स्वत: ला नेहमी गुंतून राहता येते . रिकाम्या वेळेत छंद जोपासल्याने व्यसन लागण्याची शक्यता कमी असते. सर्वकाही असूनही अनेक राजे महाराजे सुद्धा आपला छंद जोपासण्याचे काम करीत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. छंदातून विविध प्रकारचे वस्तूची आपण निर्मिती करुन, मोठा रोजगारही मिळू शकतो. व त्यामधून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करता येते. छंदाचे तोटे मानवाला जीवनात छंद नसेल तर तो नेहमी तणावाखाली आपले जीवन जगत असतो. निराशा, थकवा हे कायम त्याच्यामध्ये असते. मन हे कधीही शांत राहत नाही व  त्याचबरोबर न्यूनंगडाची भावना वाढीस लागते. छंदाची जोपासना होेत नसल्यानेच अलीकडे निराशापोटी  आत्महत्यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अलीकडे मोबाईल व इंटरनेटचाच छंद अनेकांना लागले आहेत. त्यामुळे मूळ छंदापासून ते दूर गेले आहेत. सेलिब्रिटीचे छंदजीवनामध्ये छंद हे प्रत्येकालाच असतात. परंतु, त्याची जोपासना करणेही आवश्यक आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी काय छंद जोपासतात त्याची ही माहिती. सलमान खानला महागड्या साबण,विद्या बालनला साडी जमविण्याचा,प्रियंका चोप्राला वेगवेगळ्या प्रकारचे फुटवेअर्स जमविणे आवडते.तिच्याकडे प्रत्येक ब्रॅण्डचे फुटवेअर्स कलेक्शन आहे. कंगणा राणावतला टॅटूची आवड असून, तिने आपल्या मानेवर व पायावर टॅटू गोंदवून घेतले आहेत. जॉनला बाईकचा खूप वेड असून, त्याच्याकडे विविध प्रकारच्या बाईक आहेत. बिपाशा बासूला घड्याळीची आवड असून, तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या घड्याळी आहेत. अजय देवगनला कारची आवडत असून, त्याच्याकडे विविध प्रकारचे कार आहेत. तर अमिषा पटेल ही बॅगची फॅन असून, तिला  वेगवेगळ्या बॅगचे कलेक्शन आहे.  शाहरुख खानला जीन्स पॅन्टचे वेड असून, त्यामुळे तो नेहमी तो जीन्सवर अधिक दिसतो. छंदावर आधारीत ‘एबीसीडी -२ ’वरुण धवन, श्रद्धा कपूर असलेला ‘एबीसीडी -२’ हा चित्रपटही छंदावर  आधारित असून, यामध्ये डान्सचा छंद दाखविण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एबीसीडी हा सिनेमाही डान्स छंदावरच आहे. तसेच बॉलीवूडच्या अनेक चित्रपटामध्ये अभिनेता व अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारचे  छंद जोपासत असल्याचे दाखविण्यात आलेले आहे. यावरुनच जीवनामध्ये छंद हे किती महत्त्वाचे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.  -----------------------------------------------------------