मोहरीच्या तेलात लसूण टाकून लावल्यास काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:38 IST2025-01-29T15:37:18+5:302025-01-29T15:38:59+5:30
Mustard Oil And Garlic Benefits: लसूण आणि मोहरीचं तेल लावल्यास त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. मोहरीच्या तेलात लसूण टाकून लावल्यास याचे अनेक औषधी गुण मिळतात. अशात याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊ.

मोहरीच्या तेलात लसूण टाकून लावल्यास काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्...
Mustard Oil And Garlic Benefits: लसूण आणि मोहरीच्या तेलाचा वापर खूप आधीपासून केला जातो. किचनमध्ये या दोन्ही गोष्टींचा वापर केवळ जेवण बनवण्यासाठी नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठीही केला जातो. लसूण आणि मोहरीचं तेल लावल्यास त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. मोहरीच्या तेलात लसूण टाकून लावल्यास याचे अनेक औषधी गुण मिळतात. अशात याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊ.
१) जॉइंट्समधील वेदना होतात दूर
मोहरीच्या तेलामध्ये नॅचरल पद्धतीनं अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात. तर लसणामधील एलिसिन वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतं. या दोन्हींच्या मिश्रणानं जॉइंट्समधील वेना दूर होण्यास मदत मिळते.
२) केस होतील मजबूत
जर केस मुळापासून कमजोर झाले असतील आणि गळत असतील तर मोहरीच्या तेलात लसूण टाकून डोक्याची मालिश करा. या तेलानं मालिश केल्यावर डोक्यातील ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि केसांना पोषण मिळतं. ज्यामुळे केस दाड आणि मजबूत होतात.
३) त्वचेच्या समस्या दूर होतील
लसणांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. मोहरीच्या तेलात लसूण टाकून हे तेल त्वचेवर लावल्यास खाज, एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शन यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
४) इम्यूनिटी वाढते
लसूण टाकलेल्या मोहरीच्या तेलानं मालिश केल्यास हे तेल त्वचेत अब्जॉर्ब होतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अशात वेगवेगळे आजार आणि वेगवेगळ्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
५) सर्दी-पडसा होईल दूर
सर्दी-पडसा झाल्यावर लसूण टाकलेल्या मोहरीच्या तेलानं पाठ आणि छातीवर मालिश करा. याचा गंध नाकात जाताच श्वसन तंत्र मोकळं होण्यास मदत मिळते.
कसं तयार कराल हे तेल?
एका छोट्या वाटीमध्ये मोहरीचं तेल घ्या. ४ ते ५ लसणाच्या कळ्या सोलून हलक्या ठेचून घ्या. मोहरीचं तेल हलक्या आसेवर गरम करा आणि त्यात लसूण टाका. जेव्हा लसणाचा रंग भुरका होईल तेव्हा गॅस बंद करा. तेल थंड झाल्यावर एका बॉटलमध्ये काढून घ्या.
काय काळजी घ्याल?
जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर आधी पॅच टेस्ट करा. फार जास्त गरम तेलाचा वापर करू नका. तेल डोळ जाणार नाही याची काळजी घ्या आणि खुल्या जखमेत जाणार नाही याची काळजी घ्या.
मोहरीचं तेल आणि लसणाचं मिश्रण एक नॅचरल आणि घरगुती उपाय आहे. या तेलानं अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.