तुमच्या 'या' चुकांमुळे शेविंग केल्यांवर होते जळजळ आणि स्कीन डॅमेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 10:48 AM2020-01-19T10:48:18+5:302020-01-19T10:56:14+5:30

शरीरावरचे नको असलेले केस काढण्यासाठी अनेकजण साधा सोपा पर्याय म्हणून रेजरचा वापर करत असतात.

know the reasons of skin damage while shaving | तुमच्या 'या' चुकांमुळे शेविंग केल्यांवर होते जळजळ आणि स्कीन डॅमेज

तुमच्या 'या' चुकांमुळे शेविंग केल्यांवर होते जळजळ आणि स्कीन डॅमेज

googlenewsNext

(image credit-cremocompany.com)

शरीरावरचे नको असलेले केस काढण्यासाठी अनेकजण साधा सोपा पर्याय म्हणून रेजरचा वापर करत असतात. विशेषतः  महिलांपेक्षा जास्त रेजरचा वापर  करतात.  महिलांसाठी बाजारात खास वेगळ्या प्रकारचे रेजर उपलब्ध असतात. कारण महिलांची त्वचा ही खूप सॉफ्ट असते. पण असं असलं तरी रेजर वापर करून झाल्यानंतर महिला असो किंवा पुरूष जळजळ होणे, त्वचा लाल होणे आणि त्वचेवर खाज येण्याची समस्या उद्भवत असते.  काहीवेळा रॅशेज सुद्धा येतात. त्वचा लाल दिसायला लागते. 

Image result for shaving burn

(image credit- menshealth)

तुम्हाला जर ही परिस्थिती टाळायची असेल किेंवा आपल्या त्वचेला होणारं नुकसान टाळायचं असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरचेचं आहे. चला तर मग  जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शेव केल्यानंतर त्वचेची देखभाल करण्यासाठी फायदेशीर ठरतील.( हे पण वाचा-सर्वात आधी शरीराच्या कोणत्या भागांवर म्हातारपणाची लक्षणं दिसतात? आणि ते कसं रोखाल)

Image result for SHAVING
( Image credit- askmen)

शार्प ब्लेडचा वापर

Image result for SHAVING(Image credit-breardberry)

अनेक लोक शेव करत असताना साधारण ब्लेडचा वापर करतात अशा ब्लेडच्या वापरामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर तुमच्या ब्लेडला धार नसेल तर तुम्हाला जास्त जोर लावून केस काढायला लागतील. त्यामुळे रक्त येऊ शकतं आणि पुळ्या येतात. म्हणून  तुम्ही केस काढण्यासाठी शार्प ब्लेडचा वापर करा.( हे पण वाचा-चमकदार आणि दाट केसांसाठी तुपाचा 'असा' वापर कराल तर ब्युटी प्रॉडक्ट्सना विसरून जाल)

मॉईश्चराईजर न लावणे

Related image

शेविंग केल्यानंतर त्या भागावर मॉईश्चराईजर अप्लाय करा.  त्यामुले तुमची त्वचा मऊ मुलायम  राहील. तुमच्या घरात उपलब्ध  असलेल्या क्रिमने किंवा तेलाने त्वचेची मसाज करा. जेणेकरून तुम्हाला त्वचा जळजळण्याचा त्रास होणार नाही. 

सतत रेजरचा वापर  

Image result for shaving burn

रेजरचा वापर केल्यामुळे केसांची वाढ २ ते ३ दिवसातच  दिसायला सुरूवात होते. त्यानंतर जर परत रेजरचा वापर केला तर नुकतेच उगवलेले केस पटकन निघत नाहीत तरी तुम्ही ते काढण्याचा प्रयत्न करत असता त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते.  तर तुम्हाला हातांवरचे किंवा पायांवरचे केस काढायचे असतील तर  शक्यतो रेजरचा वापर टाळा. कारण तुमची त्वचा रफ होऊ शकते. म्हणून वॅक्सचा वापर करून शरीराच्या इतर भागांचे केस काढा.

Web Title: know the reasons of skin damage while shaving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.